नळदुर्ग :  वसंतनगर येथील कुटूंबाच्या घर जागे  प्रकरणी
पालकमंत्र्यांना नागरिकांचे साकडे

नळदुर्ग,दि.२१:

गेल्या चार ते पाच दशकापासुन प्रलंबित असलेल्या 
 नळदुर्ग येथिल वसंत नगर भागातील कुटूंबाच्या घर जागेची नगरपरिषदेत नोंद घेवुन ८  अ नक्कल देण्याच्या
मागणी संदर्भात पालकमंत्री तथा  राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची भेट घेवुन नागरिकांनी आपल्या मागणीचे निवेदन दिले.


यावेळी युवा सेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव  चव्हाण यांच्यासोबत वसंत नगर  येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले ८ अ नक्कल या विषयावर चर्चा करून यावर लवकरात लवकर  मार्ग काढून ८ अ उपलब्ध करून देण्यात यावे याविषयी धाराशिव  जिल्ह्याचे पालकमंत्री सरनाईक  यांना निवेदन देण्यात आले.  आकाश जाधव, रवी महाराज राठोड, फुलचंद राठोड ,  किरण राठोड ,रोहित राठोड, राहुल जाधव, सुरज वाघमोडे, रवी राठोड यांच्यासह ग्रामस्थांशी   चर्चा करण्यात आली. पालकमंत्र्यांनी यावर लवकरात लवकर मार्ग काढू असे आश्वासन देवुन  याविषयी पुन्हा चर्चा करण्यासाठी मुंबई येथे बैठक घेण्यात येणार असल्याचे नागरिकांना सांगितले.. 

 आदी उपस्थित होते.
 
Top