नळदुर्ग शहर विकास आराखडा मंजुरीसाठी पालकमंत्र्यांना निवेदन
नळदुर्ग,दि.२१:
नळदुर्ग शहर विकास आराखडा अंतीम मंजुरी करिता मंत्रालयात गेल्या दिड वर्षांपुर्वी पासून रखडत पडले असुन याप्रकरणी शिफारस करुन ते निकाली काढण्याबाबत भारतीय जनता पार्टीच्यावतीने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक नळदुर्ग येथे आले असता निवेदन देण्यात आले आहे.
नळदुर्ग (ता.तुळजापूर जि.धाराशिव) येथील नगरपरिषदेने नळदुर्ग शहर विकास आराखडा अंतिम मंजुरीसाठी सन 2023-2024 साली मंत्रालय येथे पाठविले आहे. तरी मेहरबान साहेबांनी या प्रकरणी लक्ष घालुन मंजुरीसाठी शिफारस करावी असे निवेदनाव्दारे भाजपचे शहराध्यक्ष धिमाजी घुगे यांनी मागणी केली आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे , सुशांत भूमकर, उदय जगदाळे, निरंजन राठोड, मुद्दसर शेख, पद्माकर घोडके, उमेश नाईक, रियाज शेख, सागर हजारे, बंडू पुदाले, शशिकांत पुदाले, बबन चौधरी, आदीसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.