वागदरी येथे शिव जन्मोउत्सवा निमित्त शिव सप्ताहाचे आयोजन
वागदरी,दि.२१: एस.के. गायकवाड
वागदरी ता.तुळजापूर येथे शिव-बसव-राणा व संत काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळच्या वतीने शिव जयंती निमित्ताने शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून भागवताचार्य ह.भ.प.मधुकर नांदरे महाराज यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पुजन करून या शिव सप्ताहाची सुरुवात करण्यात आाली आहे.
शिव-बसव-राणा व काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी ता.तुळजापूरच्या वतीने वागदरी येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर,महाराणा प्रतापसिंग व संत काशिबा महाराज यांचा संयूक्त जन्मोत्सव दरवर्षी विविध उपक्रमाने व मोठया उत्साहाने सजरा केला जातो.या निमित्ताने शिव सप्ताहाचे आयोजन केले जाते. प्रति वर्षाप्रमाने याही वर्षी शिव जयंतीचे औचित्य साधून दि.१९ ते २५ फेब्रूवारी २०२५ दरम्यान जन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असू ह.भ.प. मधुकर नांदरे महाराज यांच्या हस्ते तर ह.भ.प. राजकुमार पाटील, सेवा निव्रात स.पो.नि. राजेंद्र पाटील,माजी सरपंच तथा तंटा मुक्त अध्यक्ष राजकुमार पवार,पत्रकार किशोर धुमाळ, माजी उपसरपंच दत्ता सुरवसे, ग्रा.प.सदस्य अमोल पवार, शशिकांत बिरातदारसह समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रतापसिंग व संत काशिबा महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून या शिव सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर, व्याख्यान, विविध गुणदर्शन, सामान्य ज्ञान स्पर्धा, महिलासाठी कार्यक्रम आदी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात अले असून दि.२५ फेब्रूवारी रोगी भव्य मिरवणूकीने या शिव सप्ताहाची सांगता करण्यात येणार आहे.
तरी सर्व ग्रामस्थ,महीला, विद्यार्थी व यूवा कार्यकर्ते यानी मोठया संख्येने या शिव सप्ताह मध्ये सहभागी होऊन हा शिव सप्ताह यशस्वी करावा असे नम्र आवहान जन्मोत्सव मंडळाचे अधक्ष श्रीकार धुमाळ,उपाध्यक्ष नितीन यादव,कार्याध्यक्ष शामसिंग चव्हाण,सचिव भगतसिंग ठाकूर,नागेश बिराजदार, रमेश पवार,रामसिंग चव्हाण,बालाजी बिराजदार आदीने केले आहे