विद्यार्थ्यांनी व्यसनापासून व मोबाईलपासून दुर राहाण्याचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांचे आवाहन 


नळदुर्ग,दि.२२:

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यसनापासून व मोबाईलपासून दुर राहावे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभागी व्हावे, अभ्यासाकडे दुर्लक्ष करु नये, असे आवाहन प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी विद्यार्थ्यांना केले.
नळदुर्ग येथील अंजनी प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलन व मान्यवरांचा सत्कार आयोजित करण्यात आले होते.. यावेळी अध्यक्षयी समारोपा प्रसंगी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश पाटील हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार शिवाजी नाईक, खालेद इनामदार, निवृत्त मुख्याध्यापक प्रदीप कदम, कल्पना गायकवाड आदीजण उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता, लेख, काव्य हस्तलिखित "अंजनीचे" प्रकाशान डॉ. सुहासिनी विवेक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रा.डॉ. जयश्री घोडके यांचा सत्कार करण्यात आला. तर लोकसेवा आयोग मधून महसुल सहाय्यक पदी निवड झालेल्या  शाळेची माजी विद्यार्थीनी सौ. शुभांगी सचिन गायकवाड-कदम याचा गौरव करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक नृत्यसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यास उपस्थिततानी दाद दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका ठोकळ व्ही.एन, सहशिक्षक राठोड बी.पी, शिंदे आर.एम., चव्हाण,एस.एस, दासकर सुजाता,  के.बी.काळे, एम.पी पांचाळ, सचिन कांबळे, खाटमोडे डी.एम., रणशुर बी.पी., दिपक हुलगे आदीनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभद्रा मुळे यांनी तर सुत्रसंचालन जितेंद्र मोरखंडीकर यांनी केले. आभार व्ही.एन.ठोकळ यांनी मानले.
 
Top