नळदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'डॉ जगदीश चंन्द्र  बोस' व्याख्यानमाला

नळदुर्ग,दि.२८: डॉ. दिपक जगदाळे 

 नळदुर्ग, येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नळदुर्ग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग  यांच्या संयुक्त विद्यमाने वनस्पतीशास्त्र आणि भौतिकशास्त्र  विभागाच्या वतीने डॉ जगदीश चन्द्र बोस व्याख्यानमालेचे आयोजन राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शुक्रवार  दि. २८ रोजी करण्यात आले होते.

या व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड होते. प्रमुख व्याख्याते  औषधनिर्माण शास्त्राचे जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ  चन्नाबश्वेश्वर फॉर्मसी महाविदयालय लातुरचे प्रा. डॉ. ओमप्रकाश भूसनुरे  तसेच प्रा डॉ विश्वनाथ मोटे, वनस्पतीशास्र  विभाग प्रमुख   प्रा डॉ विजय सांवत,  भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. रोहीणी महिंद्रकर, नॅक समन्वयक प्रा डॉ शिवाजी घोडके,  संयोजक प्रा डॉ उध्दव  भाले प्रा लत्ता ढोणे कु शिल्पा भोसले आर्दीची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी  राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉ सी व्ही रमन यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच  रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या  कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रस्ताविक  संयोजक प्रा डॉ. उध्दव भाले यांनी केले.  तर पाहुण्यांचा परिचय आणि आभार डॉ रोहीणी महिंद्रकर यांनी मांडला. डॉ. ओमप्रकाश भुसनूरे यानी मानवी जीवनातील इपिजेनेटीक घटक कोणते आणि ते शरिरामध्ये कशाप्रकारचे कार्य करतात. शिवाय शरिरामध्ये स्वयंप्रेरीत संप्रेरके कसे कार्य करतात, त्यासाठी आपल्या बुद्धीमध्ये नेहमीच  योग्य विचार ठेवलात तर शरिरातच योग्य रसायन तयार होऊन शरिर स्वाथ्य व्यवस्थित राहु शकते . त्याचबरोबर शरिरामध्ये कोणत्याही आजाराला बरे करणारे औषध चांगल्या विचाराने निर्माण होऊ शकते  आदी वैज्ञानिक विचाराच्या माध्यमातून डॉ जगदिशचन्द्र बोसची वनस्पतीना चेतना भावना असू शकतात अशा संदर्भातील लाईव्ह डेमो देखील चलचित्र फितीच्या  माध्यमातून मांडण्यात आल्या. दैनदिन मानवी जीवनामध्ये विविध स्वरूपात वापरत  असलेल्या साधनाच्या माध्यमातून   होणारे परिणाम आणि दुष्परिणाम कोणते होऊ शकतात यासंदर्भाने अनेक उदाहरणे देऊन आपले विचार मांडले.

तसेच दुसऱ्या सत्रामध्ये दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर येथील भौतिकशास्त्रीतील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ प्रा डॉ विश्वनाथ मोटे  यांनी डॉ जगदीश चन्द्र बोस यांचे भौतिकशास्त्रातील आणि वनस्पतीशास्त्रातील योगदान या विषयी मार्गदर्शन केले.फक्त जगदीश चंद्र बोस यांनी केलेल्या संशोधनामुळेच मार्कोनी यांना नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याविषयीचे त्यांनी केलेले संशोधन  कोणते होते यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यानी विद्यार्थ्यांना विज्ञानामध्ये उपेक्षित राहिलेल्या शास्त्रज्ञांचा आभ्यास होणे गरजेचे आहे. हाच  उद्देश डोळ्यासमोर ठेवून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे असे ते म्हणाले. 

या व्याख्यानमालेच्या  माध्यमातून भौतीकशास्त्र  विषयातील नोबल पारितोषीक विजेते डॉ सी व्ही रमन यांचे संशोधन आत्मसात करून विज्ञानामध्ये विध्यार्थ्यांनी आणि प्राध्यपकांनी प्रगती साधली पाहिजे असे मत व्यक्त केले.
शिवाय याच कार्यक्रमात वनस्पतीशास्त्र विभागाने वनस्पतीशास्त्रावर आधारीत प्रश्नमंजूशा  स्पर्धा आयोजीत केली होती त्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ येणाऱ्या विध्यार्थी विध्यार्थीनीचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी संशोधक विद्यार्थी श्री किरण व्हंताळकर , बारीक  शिंदे,उमेश सर्जे, पापा गायकवाड,  रमेश सर्जे,  काशीनाथ कोळी ,सिद्ध सुतार आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा उध्दव भाले यांनी केले  तर आभार प्रा.  रोहीणी महिंद्रीकर यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील  प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी  उपस्थित होते. 
 
Top