नुतन पोलीस निरिक्षक यादव यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार
वागदरी ( एस.के. गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सचिन यादव यानी नुकतच आपल्या पदाचा पदभार स्विकारून ते नळदुर्ग पोलीस ठाणे येथे रुजू झाल्याने त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा तुळजापूरच्या वतीने त्यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आला.
नळदुर्ग येथील पोलीस निरिक्षक गजेंद सरोदे यांची पोलीस प्रशासनाकडून अचानक पणे तात्काळ बदली झाल्याने त्यांच्या जागी सचिन यादव यांची नियुक्ती करण्यात आली असून ते नळदुर्ग पोलीस ठाणे येथे रूजू झाले आहेत. त्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,उपाध्यक इरफान काझी यांच्या हस्ते यथोचित स्वागतपर सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे एस.के. गायकवाड, शाम नागीले,किशोर धुमाळ, विजय पिसे, आरविंद लोखंडे आदी उपस्थित होते.