स्वा.वि.दा.सावरकर यांच्या आत्मार्पण दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त व्याख्यान व प्रतिमा पूजन संपन्न

शहरात स्वातंत्र्यवीरांचे स्मारक व्हावे,कार्यक्रमात एकमुखी ठराव

नळदुर्ग,दि.२८ :

येथे ब्राह्मण समाज संघटना  आयोजित स्वा.वि.दा.सावरकर यांच्या आत्मार्पण दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भव्य प्रतिमा पूजन व व्याख्यानाचे आयोजन केले होते,मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून,पुणे येथील नारदीय व वारकरी किर्तनकार व उत्तम वक्ते कु.पूर्वा शिवप्रसाद काणे यांनी स्वा.सावरकर व मराठी भाषा,कवि कुसुमाग्रज यांच्या साहित्य,लेखन,कविता व देशभक्ती,मातृभाषा याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले,

यावेळी छोटया वक्त्यांसह कमलाकर चव्हाण, डॉ.खजूरे,गोपाळ कुलकर्णी,बलभीम मुळे,प्रणाली केसकर,यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले,या कार्यक्रमात शहरातील मराठी शिक्षकांचा,व नुकतेच शासकीय सेवेसाठी स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्यांचा व सेवानिवृत्तांचा सन्मान करण्यात आला,यामध्ये प्रणाली केसकर,शुभांगी गायकवाड,राज जगदाळे,शुभदा जोशी,जयश्री घोडके यांचा विशेष सन्मान आयोजित केला होता,कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन सेवानिवृत्त शिक्षक बलभीम मुळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन जवाहर विद्यालय अणदूरचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी,समाजसेवक डॉ.खजूरे,तलाठी संध्या कुलकर्णी,माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, धिमाजी घुगे,
माजी नगराध्यक्ष नितीन कासार,माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण,माजी नगरसेवक बसवराज धरणे हे होते,

कार्यक्रमात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र शासनाचा अभिनंदनाचा ठराव कमलाकर चव्हाण यांनी मांडला. त्यास उदय जगदाळे यांनी अनुमोदन दिले,स्वा.सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा असा ठराव शिवसेनेचे संतोष पुदाले यांनी मांडला. त्यास बसवराज धरणे यांनी अनुमोदन दिले व तसेच ऐतिहासिक नळदुर्ग शहरात स्वा.सावरकर यांचे भव्य स्मारक व्हावे असा ठराव ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी यांनी मांडला .त्यास स्वा.सावरकर युवा मंचचे अध्यक्ष प्रमोद कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले,तिन्ही ठराव मोठया संख्येने उपस्थित असलेले सावरकर प्रेमीनी एकमताने मंजूर केले,यावेळी माजी नगरसेवक अमृत पुदाले,सुधीर हजारे,महालिंग स्वामी,संतोष पुदाले,रमेश जाधव,पत्रकार विलास येडगे,दिपक जगदाळे,श्रीकांत अणदूरकर,उत्तम बनजगोळे,मारुती खारवे,उमेश जाधव,सुभद्राताई मुळे,सुप्रियाताई पुराणिक,संध्याताई भूमकर यांच्यासह महिला,सावरकर प्रेमी व हिंदू बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विनायक अहंकारी,मुकुंद नाईक,प्रमोद कुलकर्णी,उमेश नाईक,सचिन भूमकर,प्रदीप ग्रामोपाध्ये,सदानंद नाईक,ज्ञानेश्वर केसकर,अजय देशपांडे,प्रसन्न कुलकर्णी,संतोष नाईक,सौरभ रामदासी,राजकुमार वैद्य,संदीप वैद्य,अजित भूमकर,मयूर जोशी,सुदर्शन पुराणिक,गजानन कुलकर्णी,संकेत भूमकर यांनी परिश्रम घेतले,कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रमोद कुलकर्णी,सौरभ रामदासी यांनी केले,प्रास्ताविक विनायक अहंकारी,तर आभार मुकुंद नाईक यांनी मानले.
 
Top