पाच वर्षात दमडी न आणणाऱ्यानी,
वल्गना करू नये - अँड. दीपक आलूरे

अणदूर दि.12.. चंद्रकांत हगलगुंडे

मुख्य रस्त्याच्या विशेषतः दोन कोटी रुपयांच्या विकास कामाबाबत मोठ्या प्रमाणात राजकारण चालू असून गावकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे हीत लक्षात घेऊन दर्जेदार काम करणारच यात शंका घेण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करून अनेक वर्षात राजकारणात असून सुद्धा गावासाठी दमडीही न आणता फुकटचे राजकारण करून ज्यांनी पाच वर्षात दमडी आणली नाही त्यांनी रस्त्याअडून व्यापारी व गावकऱ्यांना वेठीस धरू नये असा इशारा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी सभापती दीपक  आलूरे यांनी दिला आहे.

तुळजापूर तालुक्याचे विकासाभिमुख आ. राणा जगजीतसिंह पाटील यांनी विविध समाजोपयोगी विकासाला प्राधान्य दिले असून तालुक्यात असंख्य कामे चालू आहेत. येणाऱ्या काळात दहा कोटीचे कामे खेचून आणून अणदूरचा कायापालट करण्याचा आपला माणस असून त्यास आमदार पाटील निश्चितच पाठबळ देणार असल्याचे आलूरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मुख्य रस्त्याचे काम व्यापारी, गावकरी व ग्रामपंचायत यांना विश्वासात घेऊन रस्त्याचे काम दर्जेदार तर होईलच गरज पडल्यास नालीचेही काम हाती घेणार असून ग्रामपंचायतीने याबाबत पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. पन्नास वर्षात जे झाले नाही ते काम होत असताना विरोधकानी विष कालवण्याचे काम करू नये, रस्त्याच्या कामावरून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकू, आत्मदहन करू अशी वल्गना निरर्थक व हास्यास्पद असून सर्वांनी मिळून गावच्या हितासाठी निर्णय घ्यावे ज्यामुळे व्यापार वाढेल, पर्यटनाला चालना मिळेल, वाहतूक सुरळीत होईल यासाठी सर्वांनी एकजुटीने सहकार्य करण्याचे आवाहन केले.

मुख्य रस्त्याच्या कामाबाबत गावकऱ्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया....
774 गायरान अतिक्रमणाबाबत भूमी अभिलेख कार्यालय  येथे आत्मदहन तर जलसमाधी आंदोलन करून संघर्ष केला एकाच माणसाने 100 लोकांचे अतिक्रमण करून परस्पर जागेची विक्री केली, तर मुख्य रस्त्यावर अनेकांचे उदरनिर्वाह चालते. रस्त्याचे काम चांगले व्हावे, व्यापारी जगला तरच मार्केटला महत्त्व 
आहे .अतिक्रमण हे अवघड दुखणे असून सर्वांनी सामोपचाराने विकासात भाग घेतला पाहिजे.
राजेश देवशिंगकर, भाजपा तालुका माजी चिटणीस, नवज्योत सेवा प्रतिष्ठान उपाध्यक्ष.

हुतात्मा स्मारकाच्या कंपाउंड अर्धवट असून ग्रामपंचायतीने याबाबत कठोर निर्णय घेतला नाही. मुख्य रस्त्याचे काम चांगले होत असताना गावकऱ्यांचा विरोध नाही मात्र ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्यांचाच विरोध ही लाजिरवाणी बाब असून ग्रामपंचायतच्या नाकरते पणाचा कळस असल्याची भावना लक्ष्मण लंगडे यांनी व्यक्त केली.
लक्ष्मण लंगडे, सामाजिक युवा  कार्यकर्ता.

मुख्य रस्त्याचे काम गावच्या वैभवात भर घालणारी असून ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्यच जर आडकाटी आणून व्यापारी व ग्रामस्थांना वेठीस धरण्याचे काम दुर्देवी आहे. गावच्या हितासाठी स्वहीत बाजूला ठेवून विकास कार्यात सहभागी होण्याची गरज.
चंद्रकांत उर्फ बाळू घुगे, शिवसेना ठाकरे गट शाखाप्रमुख.

जिल्ह्याचे नेतृत्व व कर्तुत्व असलेल्या गावात आत्मदहन सारखे पाऊल दुर्देवी असून आलेल्या निधीचा चांगला सदुपयोग व्हावा व्यापारी व पर्यटकाचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न नेत्यांनी करावा, आदरणीय आलूरे गुरुजी , माजी मंत्री चव्हाण यांनी कधीच दुफळी निर्माण होऊ दिले नाही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावच्या विकासाला चालना मिळावी एवढीच अपेक्षा..
महाळप्पा गळाकाटे, सामाजिक कार्यकर्ते.
गावची आदर्श परंपरा असून विकास कामात राजकारण न आणता रस्त्याचे काम दर्जेदार तर व्हावेच, मात्र व्यापाऱ्यांचा संसार उघड्यावर येऊ नये याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. व्यापार वाढेल, पर्यटन वाढेल, विद्यार्थ्यांची गैरसोय टळेल याची दक्षता घ्यावी एवढीच अपेक्षा.
सुजाता उर्फ बाबई चव्हाण
सामाजिक कार्यकर्त्या
 
Top