आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांच्याकडून 
भाजपचे   संतोष  बोबडे व विलास राठोड यांचा गौरव 

तुळजापूर,दि.०४

भाजपचे तुळजापूर तालुकाध्यक्ष तालुका  अध्यक्ष संतोष  बोबडे आणि अशासकीय सदस्य, संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनाचे सदस्य तथा भाजपचे तुळजापूर  तालुका सरचिटणीस विलास राठोड  यांनी भाजप सदस्य नोंदणीचे उच्चांक  गाठल्यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचा गौरव केला आहे.


 भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही जनमानसात रुजली पाहिजे, यासाठी एक हजार सदस्यांची नोंदणी करून देशाच्या पुनर्निर्माणाच्या प्रवासात त्यांना सहभागी करून घेतल्याबद्दल तुळजापूर तालुका भाजपा अध्यक्ष संतोष  बोबडे आणि तालुका सरचिटणीस तथा सदस्य नोंदणी अभियानाचे तालुका संयोजक विलास राठोड यांचे सत्कार करुन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी आभिनंदन केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करून लोककल्याणकारी योजना आणि पक्षाची ध्येयधोरणं तळागाळातील जनमानसात पोचवण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी 
अँड.दिपक आलुरे, गुलचंद व्यवहारे, सचिन पाटील राजसिंहाराजे निंबाळकर यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top