अणदूर मुख्य रस्त्याचे प्रकरण: आठ दिवसात काररवाई न झाल्यास ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा
अणदूर दि.०५: चंद्रकांत हगलगुंडे
मुख्य रस्त्यावरील रस्त्याच्या कामा अगोदर नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाईप टाकने, रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण काढून गटार व्यवस्था करावी अशा आशयाचे निवेदन ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात आले असून आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा माजीं शिवसेना तालुकाप्रमुख बाळकृष्ण घोडके पाटील यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे शहर तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे . राज्यासह परप्रांतातुन भाविकांची मोठी वर्दळ याठिकाणी कायम असून शैक्षणिक नावाजलेले क्षेत्र आहे. या रस्त्यावरूनच ग्रामीण भागही जोडला गेला आहे. सध्या अणदूरमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून ते काम बंद ठेवून मुख्य रस्त्याचे काम हाती घेतल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.
पाणीपुरवठा योजनेचे काम व गटारीचे बांधकाम पूर्ण झाल्याशिवाय मुख्य रस्त्याचे काम करू नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले असून त्याची प्रत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्याने मुख्य रस्त्याच्या कामाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.