शिव -बसव -राणा सार्वजनिक जन्मोत्सवाच्या अध्यक्षपदी संतोष पुदालेची निवड
नळदुर्ग,दि.२५: नेताजी महाबोले
नळदुर्ग शहरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर महाराज व वीर महाराणा प्रतापसिंह महाराज यांची संयुक्त सार्वजनिक जयंती साजरी करण्यात येते.
या अनुषंगाने दि.24/02/2024 रोजी श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड पुढीलप्रमाणे करण्यात आली.
अध्यक्ष - संतोष पुदाले, उपाध्यक्ष - वैभव पाटील, प्रमोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष शिवप्पा स्वामी व नवल जाधव , सचिव शिवाजी गायकवाड, सहसचिव राहुल जाधव, सांस्कृतिक प्रमुख अमित शेंडगे , प्रवीण चव्हाण , नेताजी महाबोले व मिरवणूक प्रमुख मिरवणूक प्रमुख :- नितीन कासार, शरद बागल, अमृत पुदाले, सरदारसिंग ठाकूर, विनायक अहंकारी, बसवराज धरणे, सुधीर हजारें, प्रसिध्दी प्रमुख म्हणून नळदुर्ग शहरातील सर्व पत्रकाराची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीला माजी नगराध्यक्ष नितिन कासार, माजी नगरसेवक शरद बागल, विनायक अंहकारी, सरदारसिंग ठाकूर, शाम कनकधर,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गायकवाड, नवल जाधव, प्रवीण चव्हाण, अक्षय भोई, दर्शन शेटगार, अक्षय दासकर, वीरेंद्र बेडगे, प्रसन्न कुलकर्णी, चंदर सगरे, प्रमोद कुलकर्णी, राहुल जाधव, आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.