राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट कामाची पाहणी करून तातडीने काम पूर्ण करण्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आदेश
अणदूर,दि.२५: चंद्रकांत हागलगुंडे
राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट कामाची पाहणी करून काम तात्काळ पूर्ण करून चिवारी पाटी, भुजबळ वस्ती, मधुशाली नगर येथील पाण्याचा वीसर्ग तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य डॉ. जितेंद्र कानडे यांनी दिली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या रस्त्याची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कामासंदर्भात सूचना देऊन तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. सोबत ठाकरे गटाचे माजी तालुका अध्यक्ष बाळकृष्ण घोडके पाटील हे उपस्थित होते.
अणदूर हे सांस्कृतिक दृष्ट्या ऐतिहासिक गाव असून असंख्य जनतेचे श्री खंडोबा कुलदैवत आहे. त्यामुळे भाविकांचे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, याचा विचार करून कोणाचेही अडचण होऊ नये याची दक्षता प्रत्येकाने घेतले पाहिजे. त्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करणार असल्याची ग्वाही खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
.