महाशिवरात्रीनिमित्त वसंतनगरच्या (नळदुर्ग) श्री.पंचमुखी मुक्तेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी
नळदुर्ग,दि.२६ :
बुधवारी सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव उत्स्फूर्तपणे
साजरा करण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. विविध ठिकाणी महापूजा, महाआरती तसेच अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर नळदुर्गच्या वसंतनगर येथील श्री. पंचमुखी मुक्तेश्वर महादेव मंदिरात वसंतनगर ग्रामस्थांनी सकाळ पासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आले. सायंकाळी सात वाजता महाआरती करून संध्याकाळी नऊ वाजता औसा येथील ह.भ.प. नितीन महाराज जगताप यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले.
पंचमुखी मुक्तेश्वर महादेव मंदिराचे पुजारी ह.भ.प. श्री. शामानंद महाराज यांचे सत्कार संत श्री सेवालाल महाराज समितीचे उपाध्यक्ष संजय जाधव, रवी महाराज राठोड, दिलीप राठोड, गणेश राठोड, जेतालाल राठोड , दगडू राठोड तेजस राठोड विनोद राठोड सुयश राठोड यांनी केले.