नेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रा. खंडेराव काळे, प्रा. अकबर सय्यद यांचा बालाघाट महाविद्यालयात
गौरव
शहरातील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा. खंडेराव काळे व इतिहास विषयाचे प्रा. अकबर सय्यद यांनी नेट परिक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विजय सावंत, कार्यालयीन शिक्षण अधिक्षक धनंजय पाटील, डॉ. निलेश शेरे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.