कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे साहित्य नष्ट होत असुन 
तरुण पिढी वाचनापासून दूर ;  मोबाईलच्या आहारी गेल्याचे मत :  डॉ. तुळशिराम दबडे

नळदुर्ग,दि.२६: डॉ. दिपक जगदाळे 

 कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे व काळाच्या ओघात दिवसेंदिवस साहित्य नष्ट होत आहे. त्यामुळे तरुण पिढी वाचनापासून दूर गेली असून मोबाईलच्या आहारी गेली असल्याचे  मत डॉ. तुळशिराम दबडे यांनी व्यक्त केले. 

नळदुर्ग येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित इंग्रजी विषयाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदचे दि. २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन अणदूर महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ अनिता मुदकन्ना यांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विजय सावंत हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित पाहुण्यांचा परिचय राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. टी. एल. दबडे यांनी करून दिला.  इंग्रजी विषयाच्या राष्ट्रीय परिषदेमध्ये इंग्रजी विषयाच्या ९१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. 

 कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य डॉ सुभाष राठोड कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील इंग्रजी विभागातील प्रा.आशिष हंगरगेकर,प्रा. दादासाहेब जाधव, प्रा. बाबा सूर्यवंशी, प्रा. गजानन चिंचडवड, प्रा. झरीना पठाण यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा आशिष हंगरगेकर यांनी केले तर आभार प्रा दादासाहेब जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 
 
Top