वागदरी येथे शिवजयंती निमित्ताने आयोजित शिवसप्ताहाची भव्य मिरवणूकिने सांगता

वागदरी,दि.२६ :एस. के. गायकवाड 

धाराशिव जिल्ह्यातील वागदरी ता़.तुळजापूर येथे
शिव-बसव-राणा व काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी च्या वतीने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती चे औचित्य साधून आयोजित शिव सप्ताहाची भव्य मिरवनूकिने सांगता करण्यात आली आहे.

  वागदरी येथे शिव -बसव -राणा-काशिबा महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी च्या वतीने छत्रपती शिवाजी महारज, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रतापसिंग व संत काशिबा महाराज यांचा संयुक्त जन्मोत्सव शिव जयंतीचे औचित्या साधून विविध उपक्रमाने साजरा केला जातो. या निमित्ताने शिव सप्ताहाचे आयोजन केले जाते.
  या वर्षी दि १९ फेब्रूवारी ते २५ फेब्रूवारी २०२५ दरम्यान जन्मोत्सव मंडळाच्या वतीने शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात व्यख्यान, शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, महिलासाठी कार्यक्रम, वागदरी व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांची सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा घेण्यात आली असून या स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ११०००, ५००० व
२५०० रूपयाचे रोख पारितोषिक व स्पर्धेम सदभागी विद्यार्थाना शिवाजी कोण होता हे शिव चरित्रपर पुस्तक व स्मृती चिन्ह देण्यात आले. या सप्ताहाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात ३७ रक्तदात्या मावळ्यानी रक्तदान केले.शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पालकीतून भव्य मिरवणूक काढून या जन्मोत्सव सप्ताहाची सांगता करण्यात आली.

या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 
अँड.अमोल पाटील,प्रमोद बिराजदार,योगेश सुरवसे, जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्रीकार धुमाळ ,उपाध्यक्ष नीतीन यादव,सचिव भगतसिंग ठाकूर,अमोल पवार,रवी ठाकुर, बालाजी बिरादार,पंकज सुरवसे,शाम सिंग चव्हाण सह मंडळाचे सर्व पदाधिकारी युवा कार्यकर्ते यानी परिश्रम घेतले.
 
Top