बोळेगाव तलाठी सज्जा चें नुतन तलाठी शिवकन्या शिंदे रुजू : ग्रामस्थानी केला सत्कार

वागदरी,दि.२६: एस. के. गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील गाव कामगार तलाठी सज्जा बोळेगावचे नुतन तलाठी शिवकन्या शिंदे यानी आपला परभार स्विकारल असून ते कामावर रुजू होताच येथील ग्रामस्थानी गावच्या पोलीस पाटील अश्विनी सुर्यवंशी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून स्वागत केले.
  

 गाव कामगार तलाठी सज्जावर कार्यरत असलेले तलाठी अमर पडवळ यांची अन्यत्र बदली झालाने त्यांच्य जागी शिवकन्या शिंदे यांची शासनाने तलाठी म्हणून नियूक्ती केल्याने ते नुकतल आपला पदभार स्विकारुन कामावर रूजू झाल्याने येथील ग्रामस्थानी त्यांचा पोलीस पाटील अश्विनी सुर्यवंशी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करून स्वागत केले तर येथे कार्यरत असलेले तलाठी अमर पडवळ यांची बदली झाल्याने ग्रामस्थांच्या वतीने गावचे सरपंच विलास पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्याना निरोप देण्यात आला.

  यावेळी उपसरपंच शांताबाई मुलगे, ग्रा.प.सदस्य अंगद जाधव, सामाजिक कार्यकर्त्या संगीता सुरवसे,चैतन रुपनुर,सोपान सुरवसे,पंडीत सुरवसे, संजय सुरवसे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top