शिव-बसव-राणा- काशीबा महाराज जन्मोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी धुमाळ तर उपाध्यक्षपदी यादव

वागदरी,दि.१२: एस.के.गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील छपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महाराणा प्रतापसिंग महाराज, व संत काशीबा महाराज अर्थात शिव-बसव-राणा-काशीबा महाराज जन्मोत्सव मंडळच्याअध्यक्ष पदी युवा कार्यकर्ते श्रीकार किशोर धुमाळ तर उपाध्यक्षपदी नितीन यशवंत यादव यांची निवड करव्यात आली.
  
वागदरी येथे नुकतेच शिव- बसव - राणा - काशीबा महाराज जन्मोत्सव मंडळची बैठक संपन्न झाली या बा बैठकीत शिव जन्मोत्सवाच्या निमित्ताने शिव सप्ताहाचे आयोजन करून विविध उपक्रम राबविण्याचे ठरले असून जन्मोत्सव मंडळाची नुतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. ती पुढील प्रमाणे अध्यक्ष श्रीकार धुमाळ, उपाध्यक्ष नितीन यादव, सचिव भगतसिंग ठाकूर, कार्याध्यक्ष शमसिंग चव्हाण, मिरवणूक प्रमुख नागेश बिराजदार, रमेश पवार रामसिंग चव्हाण,बालजी बिराजदार आदींची निवड करव्यातआली. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top