नळदुर्ग , दि.१७ : शिवाजी नाईक
शहरातील विविध भागात शासकीय जागेवरील राहत्या घर जागेची नगरपालिकेत नोंद घेण्याच्या नावाखाली न.प. प्रशासनाने मनमानी करत सर्वसामान्य लाभार्थी गोर-गरीब कुटूंबाकडून मागील अनेक वर्षाची मालमत्ता कर दोनदा भरुन घेवुन आर्थिक पिळवणुक केल्याचे उघडकीस आल्याने नागरिकातुन संताप व्यक्त केले जात आहे. दरम्यान याप्रकरणी उच्च स्तरीय चौकशी करुन दोषी विरुद्ध कारवाई करावी, करापोटी ज्यादा भरलेली रक्कम परत करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
कांहीं वर्षापुर्वी मागील अनेक वर्षांपासूनची मालमत्ता कर बहुतांश लाभार्थ्यांकडून न.प.प्रशासनाने घर जागेची नोंदणी करुन घेण्याच्या नावाखाली वसुल केले.सदरील रक्कम मोठी असुन त्याची माहिती न.प.प्रशासन देण्यास टाळाटाळ करीत आहे. मात्र त्यावेळी घर जागेची नोंदणी केली नाही.
दरम्यान नळदुर्ग नगरपरिषदेने जा.क्र.४३१/न.प.न./२०२३ दि.१८/०७/२०२३ रोजी शासकीय जागेवर राहणाऱ्या लाभार्थी कुटूंबाला नोटीस देऊन जिल्हाधिकारी यांचे दि.१७/०७/२०२३ च्या आदेशानुसार रमाई आवास/ प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याकरीता शासकिय जागेवरील पात्र लाभार्थ्यांकडुन विहीत नमुन्यात प्रस्ताव दाखल करून घेतले. त्यावरुन ऑगस्ट् २०२४ मध्ये न.प.प्रशासनाने लाभार्थ्यांकडून दहा वर्षांची मालमत्ता कर एकदाच भरून घेऊन न.प. दप्तरी घर जागेची नोंद घेतली. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घर जागा नोंदणीची नक्क्ल लाभार्थ्यांना देण्यात आले. जवळपास सहा महिने होत आले मात्र लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेचा लाभ मिळाला नाही. याबाबत नागरीकात नाराजी आहे.
एकुण घराची संख्या १८६४ पैकी ४५४ घराची मालमत्ता कर एकुण १८लाख१४ हजार ५४१/- एवढी रक्कम न.प.ला भरणा केली आहे.
नगरपालिकेच्या कर निर्धारक प्रशासकीय अधिकारी पल्लवी पाटील यांच्याशी संपर्क साधले असता डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत एकुण मालमत्ता कर धारक (घराची संख्या) १ हजार ८६४ पैकी ४५४ मालमत्ता कर ( घराची) एकुण १८ लाख १४ हजार ५४१ एवढी रक्कम लाभधारकांनी न.प.ला भरणा केल्याचे सांगितले.तर २५० लाभार्थ्यांना घर जागेची नोंदणी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रती लाभार्थी एक हजार रुपये प्रमाणे नामांतरची फीस नुसार २ लाख ५० हजार रुपये जमा झाल्याचे नामांतर विभाग प्रमुखानी माहिती दिली.
प्रभाग निहाय लाभार्थ्यांनी मालमत्ता कर पुढीलप्रमाणे भरले आहे.
प्रभाग क्र.१ वडरवाडा येथील घरांची संख्या 164 पैकी फक्त् 12 मालमत्ता धारकानी 49 हजार 250 रूपये भरणा केलेली आहे. त्याचबरोबर वसंतनगर येथील घरांची संख्या 455 असुन त्यापैकी 20 घराची रक्क्म 95 हजार 865 रुपये भरले आहे.
प्रभाग क्र.2 इंदिरानगर घरांची एकुण संख्या 609 पैकी 128 घराची रक्क्म 7 लाख 42 हजार 509 रूपये मालमत्ता भरणा केलेली आहे.
प्रभाग क्र.06 कुरेशी गल्ली, साठेनगर येथील 210 घरापैकी 76 घरांची रक्क्म 1 लाख 70 हजार 027 रूपये मालमत्ता कर जमा झाले आहे.
प्रभाग क्र.08 बौध्द्नगर येथील 124 घरापैकी 71 घरांचे रक्क्म 2 लाख 41 हजार 832 रूपये मालमत्ता कर जमा झाले आहे.
सर्व्हे नं.29 मधील एकुण 40 घरांपैकी 32 घरांची रक्क्म 75 हजार 660 रूपये तर प्रभाग क्र.10 बौध्द्नगर, भिमनगर, शिवकरवाडी येथील एकुण 262 पैकी 115 मालमत्ता धारकांची रक्क्म 4 लाख 39 हजार 398 रूपये भरणा केले आहे. असे मिळुन एकुण 18 लाख 14 हजार 541 रूपये मालमत्ता कर नगरपालिकेत जमा झालेली आहे. तर उर्वरीत 1 हजार 410 मालमत्ता धारकांनी कर भरले नसल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत मालमत्ता कर भरून घेण्याबाबत न.प.प्रशासन उदासीन असल्याचे दिसुन येत आहे.
मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार
ज्या लाभार्थ्यांनी दोनदा मालमत्ता कर न.प.ला भरली असेल त्यांनी रक्कम भरलेली पावती दाखवावी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. त्याचबरोबर भोगवटदारची नक्कल मिळालेल्या लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभ घेण्याकरिता ऑनलाइन फॉर्म भरावे, उर्वरित लाभार्थ्यांना नोटीस काढून मालमत्ता कर भरून घेण्यात येईल असे सांगितले.