नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्याची 20 संगणक प्रशिक्षण केंद्राचे अडीचशे विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता

नळदुर्ग,दि.१७ : 

छत्रपती शाहू महाराज संशोधन व मानव विकास संस्था (सारथी), पुणे व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने आणि एमकेसीएल जिल्हा समन्वयक धनंजय जवळेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या शिवजयंतीच्या निमित्ताने नळदुर्ग किल्ल्याची स्वच्छता करण्याचा उपक्रम संपन्न झाला.

 या उपक्रमांमध्ये जिल्हाभरातील जवळपास 20 संगणक प्रशिक्षण केंद्राचे जवळपास 250 विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्यामध्ये किल्ल्याच्या भिंतीवर उगवलेले गवत, कचरा यांची साफसफाई करण्यात आली. नवीन पिढीला आपल्या किल्ल्याबद्दल,  इतिहासाबद्दलची माहिती मिळावी आणि यातूनच या किल्ल्यांचा वारसा जपण्याची जबाबदारी त्यांना कळावी या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात आला होता.
या उपक्रमात नळदुर्ग शिवम् कम्प्युटर एज्युकेशनचे संचालक   सतीश पुदाले , कु. पूनम बिसेनी, कु. सानिका महाबोले, तसेच कु. बेले अदिती भागवत, गायकवाड तृप्ती मल्लिकार्जुन, चव्हाण आकांक्षा अवधूत, सुरवसे ऐश्वर्या सुधीर, भोसले प्रणिता संदिपान, कु. सुरवसे पंकज नागनाथ, कु. टकले दीपक शरण इब्रामपूर, गायकवाड सुरज आणखीन बरेचसे विद्यार्थी उपस्थित होते. 

धाराशिव जिल्ह्यातील आणखीन श्री साई कॉम्प्युटर,हरी इन्फोटेक उमरगा, समर्थ कम्प्युटर सेंटर बळसुर, समर्थ कम्प्युटर सेंटर नळदुर्ग, सुपर कम्प्युटर्स अणदूर, विशाल कम्प्युटर येणेगुर, अभिनव कम्प्युटर्स उपळे, राजीव कम्प्युटर्स, अष्टभुजा स्किल तुळजापूर, श्री समर्थ कम्प्युटर तुळजापूर, ग्लोबल इन्फोटेक जे. बी. कम्प्युटर तुळजापूर, अशा बऱ्याच सेंटरचे विद्यार्थी उपस्थित होते.
किल्ले स्वच्छता अभियानामध्ये शिवम् कॉम्प्युटर एज्युकेशनचे सतीश पूदाले सर सरांनी खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली होती. आलेल्या विद्यार्थ्यांना चहा-बिस्किट, थंड पाण्याचे जार, दुपारचे जेवण देण्यात आले, यामध्ये नगरपरिषद नळदुर्ग यांचेही चांगले सहकार्य लाभले. 
 
Top