पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते २० फेब्रुवारीला नळदुर्गच्या
उपजिल्हा रुग्णालय व आरोग्य संस्थांचा लोकार्पण सोहळा
धाराशिव दि.१८ :
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नळदुर्ग येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व इतर आरोग्य संस्थांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते २० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे तर प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तर प्रमुख उपस्थितीमध्ये खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री सतीश चव्हाण,विक्रम काळे,राणाजगजीतसिंह पाटील,प्रा.डॉ.तानाजीराव सावंत,कैलास पाटील,प्रवीण स्वामी,जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांची उपस्थिती राहणार आहे.