वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकारांना अरेरावी करणाऱ्या तहसीलदारावर कारवाईकरिता पत्रकाराची जिल्हाधिकारीकडे धाव
तुळजापूर ,दि.०१ मार्च
वृत्त संकलना करिता गेलेल्या पत्रकारांना तुळजापूर तहसिल कार्यालयात तहसीलदारांनी अरेरावीची भाषा बोलून अपमानित करण्या-या घटनेप्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने याप्रकरणी कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन धाराशिव जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, दि.२५ फेब्रुवारी रोजी बेकायदेशीर वीटभट्टी बाबत सामूहिक आत्मदहन आंदोलन तहसील कार्यालय येथे होणार असल्याची माहिती मिळाल्याने काही पत्रकार हे आंदोलनस्थळी बातमी संकलनासाठी गेले असता तहसीलदार महोदयांनी पत्रकारांना बातमी संकलन करत असताना
अरेरावी भाषा करीत तुम्ही अगोदर बाहेर जा, शूटिंग करू नका, मला माहित आहे, पत्रकार कसे असतात असे म्हणून पत्रकारांना कार्यालय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उपस्थित पत्रकारांना अपमानित केले.
पोलिस निरीक्षक अनिल मांजरे यांच्या मध्यस्थीने सदरील अंदोलन आंदोलनकर्त्यांनी स्थगित करण्यात आले असता पत्रकार हे आंदोलनबाबत तहसीलदार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले असता तुळजापूर च्या तहसीलदारांनी पत्रकारांना प्रतिक्रिया न देता अरेरावी ची भाषा वापरून कार्यालयाच्या बाहेर जाण्याचा सल्ला दिला. याबाबत पत्रकार सुरक्षा समितीने आक्रमक भूमिका घेत पत्रकारांना अपमानित करणाऱ्या तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करुन कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी, जिल्हा उपाध्यक्ष रुपेश डोलारे, मकबुल तांबोळी, हैदर शेख,सारिका चुंगे,लहू कुमार शिंदे,चांद शेख,गणेश कांबळे,सलीम पठाण,आकाश हळकुंडे व अन्य पत्रकार उपस्थित होते.