आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन' संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड

मुंबई,दि.०६ :

केंद्र सरकारच्या नीति आयोगाच्या धर्तीवर स्थापन केलेल्या 'महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन' अर्थात 'मित्र' या राज्याची आर्थिक व धोरणात्मक दिशा ठरविणाऱ्या महत्वपूर्ण संस्थेच्या उपाध्यक्षपदी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री  ना. देवेंद्र फडणवीस 
यांचे आभार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मानले आहे.

 माजी मंत्री आणि आमदार  दिलीप वळसे पाटील व नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष  राजेश क्षिरसागर यांची देखील 'मित्र' संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचेही  अभिनंदन केले आहे. या निवडीबद्दल सर्वत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे त्यांच्या समर्थकांतुन अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहे.

 
Top