रिपाइं मराठवाडा विभाग नुतन उपाध्यक्ष तानाजी कदम यांचा नळदुर्ग येथे सत्कार
नळदुर्ग,दि.०७
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतून त्यांच्या खुल्या पत्रावर अधारीत स्थापन झालेल्या ना रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया हा पक्ष तमाम बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारा पक्ष असून रिपाइंच्या माध्यमातून बहुजन समाजातील उपेक्षित जनतेची निरपेक्ष भावनेने सेवा करणार असे प्रतिपादन रिपाइं आठवलेचे नुतन मराठवाडा विभाग उपाध्यक्ष तानाजी कदम यानी नळदुर्ग येथे बोलताना केले.
नुकतेच धाराशिव येथे झालेल्या जिल्हा बैठकीत रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष तथ सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार तुळजापूर येथील रिपाइंचे माजी जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम यांची मराठवाडा विभाग उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ते पहिल्यांदाच नळदुर्ग शहरात आले असता रिपाइं (आठवले) अल्पसंख्यांक आघाडी तुळजापूर व रिपाइं नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.
या प्रसगी रिपाइंचे मराठवाडा विभाग कार्यकारणी सदस्य दुर्वास बनसोडे,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष अरूण लोखंडे,रिपाइं आल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिद कुरेशी, कामगार आघाडीचे तुळजापूर शहराध्यक्ष रवी वाघमारे,रिपाइं नळदुर्ग शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे,अनिल वाघमारे, आरविंद लोखंडे,जेष्ठ कार्यकर्ते जमिल कुरेशी,मैनोदिन इनामदार,एकबाल कुरेशी,उत्तम झेंडारे,युवा कार्यकर्ते विश्वास रणे,बाबासाहेब वाघमारे,अजीम कुरेशी,वशिम कुरेशी, दादा कुरेशीसह कार्यकर्ते उपस्थित होते.