लक्ष्मी फुलारी-अरोरा एक प्रेरणादायी व्यक्तीमत्व 
जागतीक महिला दिन विशेष 
  एस.के.गायकवाड
 नळदुर्ग

एके काळी समाज व्यवस्थेमुळे चुल आणि मुल इथपर्यंतच मर्यादीत असलेली स्री ही आज सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करताना दिसत आहे.भारतीय संविधानाने दिलेल्या घटनात्मक आधिकारामुळे महिलांना  शिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे चुल आणि मुल ही मर्यादा ओलांडून घटनात्मकदृष्ट्या मिळालेल्या शिक्षणाच्या संधीचा फायदा घेऊन आज महिला शिक्षक,प्राध्यापक,डॉक्टर,वकील, इंजिनिअर,न्यायाधीश, आमदार,खासदार,मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गटविकास आधिकारी, पोलीस दलात,सैन्य दलात,अशा प्रकारे सर्वच क्षेत्रात महिला ताकतीने काम करताना दिसत आहेत.

 एवढेच नव्हे तर आज देशाच्या सर्वोच्चपदी महिला विराजमान झालेली आहे.त्यात ग्रामीण भागातील महिला ही मागे नाहीत.प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन ग्रामीण भागातील महिला ही सर्व क्षेत्रात काम करताना दिसत आहेत.त्यात ग्रामीण भागातील लक्ष्मी चंद्रकात फुलारी-अरोरा ह्या एक आहेत.

लक्ष्मी चंद्रकांत फुलारी (लक्ष्मी मुन्ना अरोरा) यांचा जन्म दि.२o/११/१९८६ रोजी जेवळी ता. लोहारा जिल्हा धाराशिव येते सामान्य कुटूंबात झाला. त्यांच्या लहानपणी वाडीलांचे निधन झाले.त्यामूळे त्यांची आणि त्यांच्या मोठ्या बहिणींची जबाबदारी त्यांच्या आईवर  पडली.आईच शिक्षण जेम तेम इ.चौथी पर्यंत झालेले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची.पतीचा अधार तुटलेला तरी ही त्यांची आई खचली नाहीं. त्यांचे आणि त्यांच्या बहिणीच्या शिक्षणासाठी फार मोठे कष्ट त्यांच्या आईने घेतले.लहानाचे मोठे करून इ. १०वी  पर्यंत  शिक्षण देवून कष्टावर लक्ष्मी फुलारी आणि त्यांची बहीण दोघींचे लाड ,कौतुक पूर्ण करून लग्न करून दिले. लग्नानंतर आपल्या मुलीनी छोटी मोटी नौकरी करावी स्वःताच्या पायावर उभे राहवे अशी त्यांच्या आईची खूप इच्छा होती.आईची इच्छा पूर्ण  करण्यासाठी त्या नौकरीच्या शोधात असतानाच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वहाक पदाची भरती निघाली. 

त्यांच्या आईने त्यांच्या पतिला वहाक पदाच्या भरतीबाबत संगीतले.त्यांच्या पतीनेही त्यास सहमती दिली.आईची इच्छा, त्यानी आणि त्यांच्या पतीने वहाक पदच्या भरती साठी केलेले प्रयात्न फळला आले.सन २००९ साली लक्ष्मी चंद्रकांत फुलारी-अरोरा ह्या कंडक्टर (वहाक ) म्हणून मुंबई ठाणे-२ एस.टी. अगारात रुजू झाल्या.आईची तीव्र इच्छा पतीची समर्थ साथ आणि दोघानी एकमेकावर टाकलेला विश्वास यामुळे तब्बल ८ वर्षे ठाणे अगारात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने लक्ष्मी फुलारी- अरोरा यानी सेवा केली.त्यांचा सर्व परिवार गावाकडे असल्याने त्यानी बादली साठी अर्ज केली. त्यांचा बदलीसाठी केलेला अर्ज महामंडळाने मंजूर करून सन २०१८ ला धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर अगारात त्यांची बदली केली.तेंव्हा पासून ते आज तागायत त्या तुळजापूर अगारात वहाक म्हणून कार्यरत असून ते प्रामाणिक पणे आणि निष्ठेने आपले कर्तव्या पार पाडत आहेत.त्यांच्या एकूनच जिवन कार्याचा विचार केला तर लक्ष्मी फुलारी-अरोरा म्हणजे शिक्षण घेवून स्व:ताच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपडणाऱ्या मुलींसाठी एक प्रेरणादायी व्यक्तीमत्वच म्हणावे लागेल.
  दि.८ मार्च जागतीक महिला दिना निमित्ताने त्याना आणि कर्तव्यदक्ष सर्व महिलाना हार्दीक शुभेच्छा..
  
  एस.के.गायकवाड
 नळदुर्ग 
 
Top