जागतिक महिला दिन विशेष,  २१ व्या शतकातील गौरवशाली भारतीय महिला ; प्रा. डॉ. महेश मोटे                    

इन्फोसिसची निर्देशिका डॉ. सुधा कुलकर्णी (मूर्ती) अहिल्यादेवी होळकर समाजसेवा पुरस्कार प्राप्त.  पुण्य भूमि भारत हा ग्रंथ २००५ मध्ये प्रकाशित करून  या ग्रंथात त्यांनी पूर्वीच्या महान व्यक्तींचे वर्णन केले आहे. ज्यातमध्ये पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश आहे. नुकताच प्रकाशित झालेला ग्रंथ The Achievers (Living Legends of lndia) लेखक-संपादक डॉ. एन. जी. काळे, इंदोर यांनी आदरणीय डॉ. सुधीर तारे, विश्वशांती दूत यांना समर्पित केला आहे. या विशेष ग्रंथाची पहिली प्रत डॉ. तारे सरांनी भारताचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदींना पाठवली आहे. भारतातील सर्व राज्याचे मुख्यमंत्री व विद्यापीठाचे कुलगुरू यांना हा ग्रंथ पाठविण्यात आला आहे.   या ग्रंथात डॉ. काळे सरांनी ७२ रियल लाईफ हिरोज आणि हिरॉइन्सच्या महान कार्यांचा उल्लेख केला आहे. सुदैवाने या गौरवशाली ग्रंथात माझाही जीवन परिचयाचा समावेश करण्यात आला आहे. या ग्रंथात ५० गौरवशाली पुरुष आणि २२ कार्यकतृत्व महिलांचा जीवनपट मांडण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्यांचे विशेष अभिनंदन करताना मनस्वी आनंद होत आहे. या गौरवशाली महिलांमध्ये   किरण उनियाल, आंध्रप्रदेश/दिल्ली (एम. ए., एम. बी. ए.) : मार्शल आर्ट्स एक मात्र महिला जिने मार्शल आर्ट्समध्ये ५२ विश्व रेकॉर्ड्स, १५ गिनीज बुक रेकॉर्ड्स बनविले आहेत. विश्व महिला दिवस २०२२ मध्ये त्यांचा मनुष्यबळ मंत्रालयाने विशेष सन्मान केला आहे. त्या महिलांना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देतात.                     
 श्रीमती मंजू लंगोटे, बैतूल, मध्य प्रदेश (एम. ए. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र) : नागपूर रेल्वे विभागात कार्यालयीन अधीक्षक, कवयित्री, लेखिका, संपादिका. डॉ. सुधीर तारे यांच्या कुछ अनकही, कुछ अनसुनी ग्रंथाचे संपादन, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित.                         

 डॉ. सुधा कांकरिया, अहिल्यानगर (महाराष्ट्र) : नेत्र चिकित्सक, बेटी बचाओ अभियानाची प्रथम प्रवर्तक, ग्रंथ : स्वागत करा कन्यांचे, पुत्री नाही तर सून ही नाही, कळीला गर्भातच तोडू नका.  २५०० गावात जाऊन विवाह मंडपातच वरवधूंना मुलगी झाली तर तिला मारणार नाही अशी शपथ देतात. टाइम्स ऑफ इंडिया, बीबीसीकडून त्यांचा सन्मान.                                  

 प्रतिमा काळे, पुणे (एम. ए., एम. एड.) : सहशिक्षिका, लेखिका, वक्त्या, कवयित्री ग्रंथ : मी प्रतिमा माझी प्रतिमा, महेश्वरची महाश्वेता (अहिल्याबाई होळकर). सॅनिटरी पॅड्स, मास्क मोठ्या प्रमाणात वाटप, राज्यस्तरीय काव्यभूषण पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदि १२५ पुरस्काराने सन्मानित.              o डॉ. नीलांबरी गानू, राजगुरुनगर, पुणे (पदवीधर) : लेखिका, ग्रंथ : गंगाजल निर्मल, शिवयोगिनी (डॉ. एन. जी. काळे द्वारा इंग्रजी अनुवाद), संत गाडगेबाबा, निलांबर, निरागस आदि. पुरस्कार : शुभम करोति संस्था, पुणे, आहिल्या नाट्य मंडळ, इंदोर द्वारा सन्मानित. मानद डॉक्टरेट (नाइजेरिया).             

डॉ. प्रमोदिनी वानखडे, पुणे (बी. ए.) : गरीब स्त्रियांना सॅनिटरी पॅड्स, कोरोना संकटात गरिबांना अन्न-वस्त्र वाटप, महिलांना रोजगार प्रशिक्षण, पुरस्कार : सावित्रीबाई फुले, डाक तिकीट, विश्व नागरिक सन्मान प्राप्त.  राजश्री माने, सोलापूर (बी. ए.) : नर्सिंग ट्रेनिंग, शिवाजी महाराज जिल्हा शासकीय रुग्णालयात सेवा कार्य, कोरोना संकटात विशेष रुग्णसेवा, महाराष्ट्रात सर्वप्रथम कोरोना वॅक्सिन ची लस देणारी नर्स, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीचे प्रशस्तीपत्र २०२३ मध्ये प्राप्त, विश्व महिला २०२० अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित.                         
 डॉ. माया यावलकर, अमरावती (एम. ए. अर्थशास्त्र, पीएच. डी.) : महिला विकास मंचची संस्थापक, कन्या विकास कार्यात अग्रणी कार्यकर्त्या, स्वास्थ्य परीक्षण, वृक्षारोपण, देहदानाची प्रेरणा, जल संरक्षण, कृषक सेवा केंद्र, पुरस्कार : टपाल तिकीट, आणि विश्व मानव अधिकार सदस्यता प्राप्त.                     

 डॉ. वर्षा चौरे, नवी मुंबई (बी.डी.एस.) : दंत चिकित्सक, समाज सेवा कार्य : रक्तदान, कोरोना काळात विशेष सेवा कार्य, यशराज फाउंडेशन संस्थापिका, महिला अधिकार, पुरस्कार : राष्ट्रीय महिला सन्मान (खंडवा, मध्य प्रदेश), आदर्श डॉक्टर सन्मान, टपाल तिकीट, विश्व मानव अधिकार आयोगाच्या सदस्या.                             

 डॉ. श्वेता वरपे, ठाणे (एम. ए.) : योगा प्रशिक्षण प्राप्त, विश्वसुंदरी श्रीमती पुरस्कार (जमाईका), योग प्रशिक्षण : पोलीस, ट्रकचालक, कैदी, विद्यापीठ, महाविद्यालय विद्यार्थी व फेसबुकवर ही योगा प्रशिक्षणाचा प्रचार व प्रसार.   डॉ. रंजना फत्तेपूरकर, इंदोर (एम. ए.) : लेखिका, १८ ग्रंथ, विशेषता : मै अहिल्या हूँ ! (मराठी अनुवाद : डॉ. एन. जी. काळे). पुरस्कार : विद्या वाचस्पती, साहिर लुधियानवी (मध्य प्रदेश) राष्ट्रभाषा सन्मान.                             
 वनिता बोराडे, बुलढाणा : पर्यावरण प्रेमी, जीव दया कार्य, सोयरे वनचरे ची संपादिका, राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्पमित्र पुरस्कार, आत्तापर्यंत ५१ हजार सापांना जीवदान.  डॉ. स्वयंप्रभादेवी मोहिते, पुणे (बी. एस्सी., एम. एस्सी.) ग्रंथ : स्वयं प्रभा, अनेक लेख, पर्यावरण प्रेमी, नक्षत्र बाग, महिला रोजगार प्रशिक्षण, प्रौढ शिक्षण, कॅन्सर, एड्स रुग्णांना मदत, सायकली, चष्मे वितरण, पुरस्कार : सोलापूर येथे विशिष्ट महिला सन्मान, विश्व संसद सदस्यता, डॉ. आंबेडकर सन्मान.                                
 नंदा राऊत, पनवेल (बी. कॉम.) : पत्रकारिता प्रमाणपत्र, विविध प्रकारचे लेखन, कार्य : जेजुरी खंडोबा दर्शनास गेल्यानंतर मंदिराची दुरावस्था पाहून दुःखी, कमिशनरला पत्र व्यवहार अहिल्यादेवींनी दिलेली जमीन विश्वस्तांनी विकली. निवडणूक लढवून विजयी. अनेक सुधार कार्य.                                
 प्रो. छवि गौड, उज्जैन/ मुंबई (बी. जे., एम. जे. एम. फिल.) : विविध प्रकाशने, पुस्तकांचे पेपर बँक संस्करण, लेख, प्रेरक उद्बोधन, टी. व्ही. चॅनल्स, कलर्स, स्टार प्लस, इरोस, डी. डी. वर शॉर्ट फिल्मे. वर्तमान : निर्देशक ब्रॉडकास्टिंग एड इन्फर्मेशन इन्स्टिट्यूट, विद्यापीठ प्रोफेसर, भूतानकडून मैत्री सन्मान, युनिसेफकडून सन्मान, डॉ. बीना बुदकी (श्रीनगर/मुंबई) : २४ ग्रंथ, बंगाली, काश्मिरी पुस्तकांचे हिंदी अनुवाद, समाजसेवा, महिला उत्थान, पुरस्कार : कोरोनामुळे भारतात मृत्यू पावलेल्या एक लाख लोकांचे  अंतिम संस्कार स्वखर्चाने केले. गिनीज रेकॉर्ड, अरेबिया व अमेरिका देशाकडून सन्मान प्राप्त,कांचनवीर, यवतमाळ (बी. ए., बी. एस. डब्ल्यू.) : स्वतःची पाच एकर जमीन विकून आदिवासी मुलींकरिता वसतिगृह, शाळा-कॉलेज मध्ये रोजगार प्रशिक्षण व  नोकरीच्या संधी. पुरस्कार : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय २०, संयुक्त राष्ट्र गुडविल अंबॅसडर.  वीणा रारावीकर (बी. एस्सी., एम. बी. ए.) : संगीत स्नातक, लेखिका, नभोवाणी, संमेलनात गायन, युट्युबवर प्रसारण, पुरस्कार : संत नामदेव, डॉ. आंबेडकर, सावित्रीबाई फुले, इंदोरमध्ये सन्मान. डॉ. भाग्यश्री (एम. बी. बी. एस.) : चिकित्सक, समाजसेविका, विशेष योगदान : कोरोनामध्ये मृत पावलेल्या शेकडो लोकांचे  अंतिम संस्कार स्वखर्चाने. ज्यांच्या भाग्यात स्वजनांचा  साथ नाही, त्यांना भाग्यश्रीचा साथ.  डॉ. अनिता शर्मा, इंदोर (एम. बी. बी. एस.) : समाजसेवा, अनाथांची माता, ७८ अपंग मुला-मुलींना आश्रय, मदर्स डे वर सन्मान प्राप्त.                डॉ. चंदरकला सिंह (पंजाब/मुंबई) :  संविधान फिल्मी गायिका, शून्य ते शिखर फाउंडेशन ची संस्थापक, पुरस्कार : राष्ट्रीय १३, आंतरराष्ट्रीय १२ पुरस्काराने सन्मानित. डॉ. संगीता सिंधानिया (एम. कॉम., पीएच. डी.) : प्राचार्य, मालवांचल कॉलेज, दिल्ली. गणतंत्र परेड शिबिरात राष्ट्रीय सेवा योजनेच्या क्वीजमध्ये प्रथम पुरस्कार (१९९०). संगठक मार्गदर्शक डॉ. एन. जी. काळे, जिल्हा संघटक, देवी अहिल्या वि. वि., इंदोर, सेमिनार, वेबीनारचे आयोजन. पुरस्कार : नेपाल सरकारकडून सन्मान, टी. व्ही. चैनल, ऑल इंडिया रेडिओवर चर्चा. डॉ. एन. जी. काळे यांचा हा ग्रंथ १५ विदेशात व ६४ भारतीय विद्यापीठात गेला आहे.   ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्ताने सर्व महिलांचे विशेष हार्दिक अभिनंदन !                     

 प्रा. डॉ. महेश मोटे    
 समन्वयक तथा संशोधन मार्गदर्शक ,संशोधन केंद्र, राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभाग  श्री माधवराव पाटील महाविद्यालय मुरुम, ता. उमरगा, जि. धाराशिव.
 
Top