नळदुर्ग येथे शिवशाहीर संतोष साळुंखे यांचा शाहीर महाराष्ट्राचा कार्यक्रम संपन्न

शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीचे आयोजन

नळदुर्ग,दि.२० :

छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा बसवेश्वर महाराज,महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त समितीच्या वतीने लातूर येथील शिवशाहीर संतोष साळुंखे यांचा शाहीर महाराष्ट्राचा कार्यक्रम आयोजित केला होता,हिंदवी स्वराज्याचा धगधगता इतिहास ,महात्मा बसवेश्वर महाराजांचा समानतेचा संदेश, महाराणा प्रतापांचा पराक्रम या शिवशाहीरांनी स्फूर्ती गीतातून,पोवाड्यातून सांगितला.

पाळणा हा या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला,शिवशाहीरांनी गायलेल्या पोवाड्यामुळे उपस्थिताना अक्षरशः डोळ्यासमोर चित्र उभं राहावं तस सादरीकरण केलं,नागरिकांनी उत्स्फूर्तपणे दाद देत टाळ्यानी प्रोत्साहन दिले,कार्यक्रमापूर्वी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख (शिंदे गट)ज्ञानेश्वर घोडके,प्रा.पांडुरंग पोळे,डॉ.जितेंद्र पाटील,पत्रकार संघांचे अध्यक्ष सुहास येडगे यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले,त्यानंतर नृत्यस्पर्धेसाठी दिशा नागरी सहकारी पतसंस्था,वत्सला गॅस एजन्सी,व पाटील हॉस्पिटल यांच्या वतीने ठेवण्यात आलेल्या पारितोषिकाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले,या प्रसंगी प्रा.संतोष पवार,कमलाकर चव्हाण,ज्ञानेश्वर घोडके,प्रा.पांडुरंग पोळे,पत्रकार तानाजी जाधव,यांनी ही मनोगत व्यक्त केले,शिवशाहीर संतोष साळुंखे व उपस्थित मान्यवराचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला,यावेळी जेष्ठ पत्रकार विलास येडगे,शिवाजी नाईक उत्तम बनजगोळे,मनोज तडवळकर,उमेश जाधव, सरदारसिंग ठाकूर,अमृत पुदाले,दिपक काशीद,बंडू कसेकर उपस्थित होते,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक अहंकारी यांनी केले,प्रास्ताविक संतोष पुदाले तर आभार प्रमोद कुलकर्णी यांनी मानले,कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी समितीचे अध्यक्ष संतोष पुदाले उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी,वैभव पाटील,कोषाध्यक्ष नवल जाधव, शिवय्या स्वामी, सांस्कृतिक प्रमुख अमित शेंडगे,प्रविण चव्हाण,नेताजी महाबोले,प्रसन्न कुलकर्णी,दर्शन शेटगार, लखन भोसले, प्रमोद जाधव,जमन ठाकूर,चंदर सगरे, यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले,कार्यक्रमास शिव-बसव-राणा प्रेमी नागरिक व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top