शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या नृत्यस्पर्धेला मोठा प्रतिसाद

जिपचे माजी अध्यक्ष धीरज पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

नळदुर्ग,दि.१८:

सोमवारी शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सवानिमित्त बालकासाठी नृत्यस्पर्धा आयोजित केली होती., यावर्षीही बाल गट व खुला गट असे दोन गटातुन साठहून अधिक स्पर्धेकांनी सहभाग नोंदवला होता.
या कार्यक्रमासाठी जिपचे माजी अध्यक्ष धीरज पाटील,माजी जिप सदस्य प्रकाश चव्हाण,जळकोटचे सरपंच अशोकराव पाटील,कृष्णात मोरे,चंद्रकांत बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेचे उदघाट्न करण्यात आले.

शिवकन्या,पाळणा,देशभक्तीपर गीत,समूह गीत असे खास आकर्षण या स्पर्धेत होते प्रेक्षकानी सर्वच स्पर्धेकांना दाद देत प्रोत्साहन दिले,यावेळी शिवगर्जना सुद्धा काही स्पर्धेकांनी दिली

समितीचे अध्यक्ष संतोष पुदाले,उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी,वैभव पाटील,कोषाध्यक्ष नवल जाधव,शिवय्या स्वामी,सांस्कृतिक प्रमुख अमित शेंडगे,नेताजी महाबोले,प्रविण चव्हाण,शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. धीरज पाटील , प्रकाश चव्हाण यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या,स्पर्धेसाठी निरीक्षक म्हणुन प्रा.संतोष पवार, प्रा.दबडे,प्रा.थिटे,डॉ.सत्यजित डुकरे यांनी काम पाहिले,स्पर्धेसाठी दिशा नागरी सहकारी पतसंस्था, वत्सला गॅस एजन्सी,पाटील हॉस्पिटल यांच्यावतीने दि-18मार्च रोजी बक्षीस वितरण होणार आहे.यावेळी शिव-बसव-राणा प्रेमी नागरिक व स्पर्धक मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top