नळदुर्ग,दि.१८:
नळदुर्ग शहरातील अनाधिकृत असलेले मांसाहारी दुकाने बंद करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सुनील ऊर्फ बबन चौधरी यांनी लेखी निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे सोमवार दि.१७ मार्च रोजी केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, नळदुर्ग शहरातील नानीमा रोड ते बालाघाट कॉलेज जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर अनाधिकृत मांसाहारी दुकाने थाटली आहेत. त्या दुकानात होत असलेले मांस भाजणे व इतर टाकाऊ साहित्य रस्त्या शेजारील गटारीत टाकत असल्यामुळे त्याची दुर्गंधी पसरुन परिसरात राहणाऱ्या नागरिकांना व रस्त्यावरुन महाविद्यालयाकडे ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उदभवन्याची शक्याता आहे.तसेच रस्त्यालगत असलेल्या झाडांची कत्तल करून ही दुकाने उभी होत आहेत. त्रासदायक ठरणा-या अनाधिकृत मांसाहारी दुकाने बंद करावी अशी मागणी करण्यात आली आहे.