नळदुर्ग शहरात छावा चित्रपट पाहण्यास उसळली  गर्दी ; शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीचा उपक्रम

नळदुर्ग,दि.१७ :

शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सवानिमित्त रविवार रोजी शहरातील भवानी चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत छावा या चित्रपटाचे आयोजन केले होते. 

प्रारंभी महाराष्ट्र राज्य पोलिस प्राधिकरणाचे सदस्य उमाकांत मिटकर यांच्या  हस्ते प्रतिमेचे पूजन करून छावा चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले.चित्रपट दाखवण्यासाठी  अँड.अरविंद बेडगे यांनी सहकार्य केले आहे. यावेळी माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण,शरद बागल,बसवराज धरणे,अमृत पुदाले, विनायक अहंकारी, सरदारसिंग ठाकूर,संजय जाधव, पत्रकार विलास येडगे, समितीचे अध्यक्ष संतोष पुदाले,उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, वैभव पाटील,कोषाध्यक्ष नवल जाधव,शिवय्या स्वामी, सांस्कृतिक प्रमुख अमित शेंडगे,नेताजी महाबोले, प्रविण चव्हाण,सचिव राहुल जाधव यांच्यासह  शिव-बसव-राणा प्रेमी नागरिक चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते.
 
Top