शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सवानिमित्त महिलांच्या हस्ते स्थापना; आमदार प्रविण स्वामी शोभायात्रेत सहभागी
नळदुर्ग,दि.१७:
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही तिथीनुसार शिव-बसव-राणा सार्वजनिक जन्मोत्सव मोठया उत्साहात साजरा केला जात आहे,शहरात लोकमान्य वाचनालय येथून भव्य शोभायात्रा काढून भवानी ज्योत व भगवाध्वज यंदा महिलांनी हाती घेत स्वा.सावरकर चौक,धर्मवीर संभाजी चौक,चावडी चौक मार्गे भवानी चौकात शोभायात्रेची सांगता करून प्रतिमेची स्थापना करण्यात आली,
माता-भगिनींच्या हस्ते व उमरगा-लोहारा विधानसभेचे आमदार प्रविण स्वामी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी महिला, बालक, समितीचे पदाधिकारी,लोकप्रतिनिधी,पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते व शिव-बसव-राणा प्रेमी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत छावा चित्रपट,लहान मुलां-मुलीसाठी नृत्यस्पर्धा,शिवशाहीर संतोष साळुंखे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम व दि 20मार्च रोजी भव्य मिरवणूक होणार आहे,या सर्व कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.