तुळजापूर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदी देवानंद रेड्डी, सचिव सचिन चौधरी तर मानद अध्यक्षपदी प्रशांत भोसले यांची निवड

तुळजापूर,दि.०३ :

तुळजापूर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी  पुनश्च एकदा  देवानंद रेड्डी यांची  तर तालुका सचिवपदी सचिन चौधरी यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली आहे.यावेळी मानद अध्यक्षपदी प्रशांत  भोसले यांचीही निवड करण्यात आली.

नुतन कार्यकारणीच्या निवडीबद्दल संघटनेचे माजी अध्यक्ष प्रशांत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक होवुन पुढीलप्रमाणे कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे.

अध्यक्ष देवानंद रेड्डी, उपाध्यक्ष विनेश कांबळे, सचिव सचिन चौधरी, कायदेशीर सल्लागार बालाजी कुंभार, महिला उपाध्यक्ष स्वाती खोपडे, महिला संघटक श्रीमती गलांडे ,कोषाध्यक्ष दिगंबर कांबळे, संघटक म्हणून लक्ष्मण कांबळे व इतर कार्यकारणीत निवड झालेल्या  सर्वांचे यावेळी सत्कार करण्यात आले. नुतन पदाधिकारी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

यावेळी संघटनेचे राज्य सल्लागार विजयसिंह नलावडे
जिल्हाध्यक्ष महादेव जगताप, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन घोगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 
Top