छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा नळदुर्ग शहरात उभारण्याची भाजपचे सुनील चौधरीची मागणी
नळदुर्ग,दि.०५
नळदुर्ग नगरपालिकेने शहरात अनेक राष्ट्र पुरुषांचे स्मारक, पुतळे उभारले आहेत. त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन देव, देश, धर्म जीवंत ठेवला अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा नळदुर्ग शहरात उभारावा अशी सर्व शिवशंभू प्रेमींची इच्छा आहे.
शहरातील हुतात्मा निलय्या स्वामी उद्यानामध्ये उभारावा या मागणीचे निवेदन भाजपचे नळदुर्ग शहर उपाध्यक्ष सुनील चौधरी यांनी धाराशिव येथे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांना भेटून दिले आहे.