विद्यार्थ्यांनी  यश संपादन करुन प्रगती करण्याचे माजी सरपंच ज्योतिकाताई चव्हाण यांचे आवाहन 

जळकोट,दि.०६

मुला-मुलींनी आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात यश संपादन करुन प्रगती केली पाहिजे असे मत माजी सरपंच ज्योतिकाताई चव्हाण यांनी केले.


तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या वतीने महिला दिनानिमित्त गावातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे, दोन मुलींवर कुटुंब नियोजन केलेल्या मातांचे,व लग्न होऊन शिक्षण घेत असलेल्या मुलींचे सत्कार करण्यात आले.यावेळी चव्हाण बोलत होत्या.सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका समन्वयक नागिनी सुरवसे यांनी केले . यावेळी समुपदेशिका वासंती मुळे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी गावातील देविदास चव्हाण,हरीचंद्र चव्हाण,छमाबाई चव्हाण,काजल चव्हाण, यांच्या सह कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास राजश्री चव्हाण, शांताबाई चव्हाण, रिना चव्हाण, शांताबाई राठोड, सविता राठोड,इंदूबाई राठोड, रेवाप्पा राठोड, अरुण चव्हाण पर्यवेक्षक  इंदूमती कबाडे, सुरेखा चव्हाण,यांच्या सह महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top