वागदरीत ग्राम दैवत श्री भवानसिंग महाराजांची यात्रा विविध धार्मिक कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात संपन्न
वागदरी,दि.२१:एस.के. गायकवाड
तुळापूर तालुक्यातिल वागदरी येथील ग्राम दैवत श्री संत भवनसिंग महाराज यांची दोन दिवसिय यात्रा मोठ्या उत्साहाने व विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न झाली.
यात्रे निमित्ताने दि. २o मार्च २o२५ वार गुरुवार या दिवशी येयीलं नाथ महाराजांच्या मंदिरासमोर हरी जागराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता चुंगी येथील सद्गुरु भवानसिंग महाराजांच्या पालखी चे आगमन वागदरी मध्ये होताच येथील भवानसिंग महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्या साह्याने वागदरी नगरी मधून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
त्या नंतर नाथ महाराज मंदिरासमोर रात्री किर्तन व चक्रीभजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साने व आनंदाने संपन्न झाला.
दुसऱ्या दिवशी दि.२१ मार्च २o२५ वार शुक्रवार रोजी सकाळी नाथ महाराज मंदिरासमोर प्रवचन झाल्यानंतर प्रत्यक्ष दिंडीला सुरुवात झाली. नाथ महाराज मंदिरा समोरून दिंडीचे आगमन मारुती मंदिरा समोरील मैदानामध्ये झाले व तेथे भजनी मंडळाच्या विविध प्रकारच्या पावलांचे सादरीकरण करण्यात आले. व काही अभंग घेऊन दिंडी पुढे भवानसिंग महाराज मंदिरापुढे दाखल झाली.मंदिरासमोर छोटे छोटे धार्मिक कार्यक्रम होऊन हरिभक्त परायण चरणसिंग परीहार महाराज यांच्या हस्ते कालावाटप होऊन शेवटी लाही फोडून दोन दिवसीय यात्रा मोहत्सवाची सांगता करण्यात आली. यात्रे निमित्ताने काही मान्यवर व्यकींचा सत्कार यात्रा कमिटीच्या वतीने करव्यात आला.
या दोन दिवसिय यात्रा मोहत्सवात वागदरी, नळदुर्ग,चिकुंद्रा,चुंगी, येडोळा, खुदावाडी, गुजनुर, दहिटणा, शहापूर, गुळहळ्ळी, लोहगाव, नंदगाव, व परिसरातील भावीक भक्त, महिला, युवक ग्रामस्थ हजारोंच्या संखेने उपस्थित होते.