माधवराव पाटील महाविद्यालयात पदवीदान समारंभ थाटात संपन्न ; विद्यार्थ्यांचा पदवी घेण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
मुरूम, ता. उमरगा, दि. २९
येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर व माधवराव पाटील महाविद्यालय परीक्षा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन २०२३-२४ पदवीदान समारंभ शनिवारी (ता. २९) रोजी थाटात संपन्न झाला.
या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरसिंग कदम, राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. महेश मोटे, वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. रवींद्र गायकवाड होते. प्रारंभी माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध शाखेच्या शंभरहून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदव्या देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. बिराजदार यांनी दिला यशस्वी वाटचालीचा विद्यार्थ्यांना मंत्र. विद्यार्थ्यांनी आपल्या यशात गुरुजनांचा वाटा असल्याचे सांगून कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्ष समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे म्हणाले की, विद्यार्थ्यांना मिळालेल्या पदवीचा अतिशय दक्ष राहून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वासाठी आणि समाजासाठी उपयोग झाला पाहिजे. आपण मिळवलेल्या पदवीचा मान-सन्मान राखून सामाजिक बांधिलकीच्या भावनेने त्याचा सदुपयोग करावा. वाणिज्य अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. विनायक रासुरे, डॉ. रवींद्र आळंगे, डॉ. विलास खडके, डॉ. शिला स्वामी, डॉ. संध्या डांगे, डॉ. सुजित मटकरी, डॉ. सुभाष हुलपल्ले, आनंद वाघमोडे, राजानंद स्वामी आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नरसिंग कदम यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राम बजगिरे तर आभार प्रा. डॉ. अरुण बावा यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित विद्यार्थ्यांना पदवीदान प्रसंगी पदवी प्रदान करताना डॉ. अशोक सपाटे, चंद्रकांत बिराजदार, नरसिंग कदम, महेश मोटे, रवींद्र गायकवाड व अन्य.