प्रसाद राठोड यांची भारतीय महासंघ पंच प्रशिक्षकपदी निवड
नळदुर्ग,दि.२९: डॉ. दिपक जगदाळे
नळदुर्ग येथिल कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बीएससी प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी प्रसाद दिनेश राठोड याची भारतीय महासंघ लाठी पंच प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी त्याचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील, डॉ. दिपक जगदाळे, ग्रंथपाल डॉ.सुभाष जोगदंडे, प्रा.पांडुरंग पोळे,क्रिडा शिक्षक डॉ.अशोक कांबळे, डॉ. कपिल सोनटक्के आदी उपस्थित होते. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.