भाविक भक्तांची वाढती संख्या लक्षात घेऊन तुळजापूर शहर व मंदीराच्या विकासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही - मुख्यमंत्र्याची घोषणा
नळदुर्ग,दि.३०: एस.के.गायकवाड
मंदीर दर्शन दौऱ्या निमित्ताने महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी च्या पावन भूमित तुळजापूर,(जिल्हा धाराशिव) येथे महाराष्ट्राचे मुख्यमांत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या व तुळजाभवानी मंदीर समितीच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे तुळजापूर येथे हेलीपॅडवर अगमन होताच आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तर माजी मंत्रीं बसवराज पाटील, औसाचे आमदार आभिमन्यू पवार,बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत,माढाचे माजी खासदार संजयनाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फटाक्याची आतिषबाजी करुन कार्यकत्यानी आनंदोत्सव साजरा केला.प्रारंभी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून आभिवादन करण्यात आले.याप्रसंगी भाजपा शहर, तालुका व जिल्हा शाखेच्या वतीने भाजपासह महायुतीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्य हस्ते भला मोठा हार क्रेंनद्वारे घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून मंदीर जिर्णोद्वाराच्या कामाची पहाणी करून भाविकांच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने विकास कामाचा आढावा घेतला.दिवसेन दिवस भावीकांची वाढती संख्या लक्षात घेता तुळजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रस्तावित महत्वकांक्षी विकास आराखड्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्या पुढे करण्यार आले असता भाविकासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांचा समावेश असलेल्या प्रस्तावित आराखडयातील विकास कामा करिता निधी कमी पडू दिला जाणार नाही असे मुख्यामंत्री फडणवीस यानी सांगीतले.
याप्रसंगी मंदीर समितीच्या वतीनेही त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील , प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड अनिल काळे,
माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, विभागिय आयूक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार, विशेष पीलीस महानिरिक्षक विरेश मिश्रा,जि.प. चे मुख्य कार्यकारी आधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस आधिक्षक संजय जाधव,भजपा जिल्हा अध्यक्ष संताजी चालूक्य,तालूका अध्यक्ष संतोष बोबडे आदीसह भाजप व महायुतीतील सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.