तुळजापूर: गटशिक्षणाधिकारी श्रीमती मेहरुनिसा
इनामदार यांचा सेवापूर्ती गौरव
तुळजापूर ,दि.०३
तुळजापूर तालूक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती मेहरुनिसा इनामदार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभ तुळजाभवानी पुजारी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अगोदर तालूक्यातील गुणवंत शिक्षक श्री पी. के. राठोड व ज्येष्ठ नेते अशोक मगर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिवचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे होते. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन प्राचार्य जटनुरे, एस सी ई आर टी चे सहसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ, प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री. अर्जून जाधव, शिक्षक नेते लालासाहेब मगर यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अर्जून जाधव साहेब यांनी केले. यावेळी एस सी ई आर टी चे सहसंचालक श्री नदाफ यांनी श्रीम. इनामदार यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.यावेळी शिक्षक नेते बशीरभाई तांबोळी व बेताळे यांचीही समयोचित भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना गटशिक्षणाधिकारी श्रीम. इनामदार म्हणाल्या की, सर्वाच्या सहकार्याने तालूक्यात भरीव कार्य करु शकले. तालूक्यातील शाळांची गुणवत्ता तसेच सलग तीन वर्षे सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमध्ये तालूका प्रथमस्थानी ठेवू शकले. वरिष्ठ कार्यालयातील सर्व वरिष्ठांनी वेळोवेळी सहकार्य केले.त्या सर्वांचे आभार मानले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य जटनुरे यांनी एक महिला अधिकारी एवढया मोठ्या तालूक्याचा कारभार किती सक्षमपणे सांभाळू शकतात हे सिद्ध केले. सर्व शासकीय कामकाज तथा सर्व शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन आपला तालूका प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहिला पाहिजे यासाठी प्रयत्न केला. त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लालासाहेब मगर यांनी तर आभार केंद्रप्रमुख संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. तानाजी महाजन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोहन भोसले, राहूल जाधव, लालासाहेब मगर यांनी पुढाकार घेतले.