तुळजापूर येथे ब्राह्मकुमारीज स्थानिक सेवा केंद्रात शिवध्वाजारोहनाचा कार्यक्रम उत्साहात
महाशिवरात्री निमित्त रविवार दि.०२ मार्च रोजी तुळजापूर येथे ब्राह्मकुमारीज स्थानिक सेवा केंद्रामध्ये शिवध्वाजारोहनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडले.
याप्रसंगी पूर्व कार्यकारी अभियंता व ब्राह्मकुमार प्रताप भाई ,पंढरपूर सेवाकेंद्र संचालिका उज्वला बहेनजी
यांनी.प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरी विश्वविद्यालय कार्याबद्दल, महाशिवरात्र आध्यात्मिक रहस्याबद्दल सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी तुळजापूर उप सेवाकेंद्र संचालिका स्मिता बहेनजी,बी.के. सुरेशभाई जगदाळे तसेच तुळजापूर शहरातील व नळदुर्ग , सिंदफळसह विविध गावातुन आलेले अनेक महिला, पुरुष मान्यवर उपस्थित होते.