तुळजापूर तालुकातील वागदरी येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा
वागदरी,दि.०९:एस.के.गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत वागदरीच्या वतीने येथिल जि.प. प्राथमिक शाळेत जागतीक महिल दिना निमित्ताने कार्मक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामान सरपंच सौ.तेजाबाई शिवाजी मिटकर ह्या होत्या व प्रमुख पाहणे म्हनूण उपसरपंच सुरेखा भालचंद्र यादव,जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी, माजी उपसरपंच मिनाक्षी महादेव बिराजदार,तर प्रमुख अथिती म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे सन्माननिय सदस्य उमाकांत मिटकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांती ज्योती सावित्रीमाई फूले यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांचा हस्ते पूजन करून आभिवादन करण्यात आले. याप्रसंगी येथील अंगणवाडीचा विभागात प्रथम क्रमांक आल्याने अंगणवाडी कार्यकर्ती पद्मीनबाई पवार व मदतनिस रुपाली जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.तसेच येथील विधवा वृद्ध महिलाना ग्रा. प. च्या वतीने मायेची चादर व खाऊ वाटप करण्यात आले. तर उपस्थित सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी उमाकांत मिटकर यांच्या पुढाकारातून
ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज मित्र परिवारांच्या सौजन्याने शाळेतील विद्यार्थ्याना मध्यान भोजनासाठी ताट वाटीचे वाटप करव्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन सहशिक्षक तानाती लोहार यानी केले तर अभार शाळेच्या मुख्याध्यापिक महादेवी जत्ते यानी मानले.
यावेळी उमेदच्या सिआरपी विद्या बिराजदार,शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा कोमल झेंडारे,अशा कार्यकर्ती पार्वती बिराजदार, सामाजिक कार्यकर्त्या भारतबाई यादव,सुंदरबाई सोमवंशी, रंजना सुरवसे जेष्ठ कार्यकर्ते भालचंद्र यादव,भाजपा मेडीया सेलचे तालूका अध्यक्ष किशोर धुमाळ, रिपाइं (आठवले) चे एस.के.गायकवाड,भाजपाचे तालूका उपाध्यक किशोर सुरवसे,माजी उपसरपंच दत्ता सुखसे,रामसिंग परिहार, बाळू पवार,बालाजी बिराजदार,दत्ता पाटील,सह कार्यकर्त,महिला ग्रामस्थ उपस्थित होते.