जागतिक महिलादिनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप

अणदूर,दि.०८: चंद्रकांत हागलगुंडे 

 जागतिक महिला दिन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शहापूर ता.तुळजापूर येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
        
या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पौर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था अणदूर ता.तुळजापूर यांच्या वतीने सामाजिक सेवा,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी  पालकांचा आर्थिक भारासाठी मदत म्हणून शाळेमध्ये गरीब होतकरू  विद्यार्थ्यांना  शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप संस्थेचे सचिव कु सुजाता उर्फ बाबई चव्हाण, श्रीमती विशाखा मुकरे,  नागेश चव्हाण यांच्या हस्ते शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा श्रीमती स्मिता चव्हाण, ग्रामपंचायत सदस्या श्रीमती पुजा मोरे,सीआरपी शहापूर श्रीमती लक्ष्मी सुरवसे, यांच्या उपस्थितीत इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांना वर्णमाला अभ्यास पुस्तिका, प्रत्येक तीन-चार वही संच, एक रेघी वही,दुरेघी वही, चार रेघी वही,एक रेघी रजिस्टर संच, पेन,स्केज पेन बॉक्स, चित्रकला साहित्य,स्केज,रबर, पेन्सील, स्कुल बॅग आणि साबण व तेल बॉटल इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.

 एकूण 300 विद्यार्थ्यांना यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील शिक्षिका श्रीमती इनामदार , अंगणवाडी ताई श्रीमती सागरिका कांबळे, श्रीमती शोभा व्हंंताळे, श्रीमती सारीका बंडगर, श्रीमती जनाबाई खरात, आणि मान्यवर महिलांचा फेटा, पुष्पहार, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. 
        
यावेळी सुजाता  उर्फ बाबई चव्हाण यांनी संस्थेचे कार्य आणि उद्देश स्पष्ट केले तर शाळेचे मुख्याध्यापक देविदास राठोड  यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगून महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
       
या वेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा खुदावाडी चे मुख्याध्यापक  विलास चव्हाण , शिक्षिका  शिरगूरे  ,  मगतराव , गुम्मे  व सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.प्रास्ताविक  कोळी यांनी केले तर आभार  भोसले  यांनी मानले.
 
Top