वसंतनगर नळदुर्ग शाळेत गुढी पाडवा -प्रवेश वाढवा उपक्रम संपन्न
नळदुर्ग,दि.०१
शहरातील वसंतनगरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गुढीपाडवा -प्रवेश वाढवा उपक्रमांतर्गत शाळेतील लेझीम पथकासह नवागताचे साखरेचा हार, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व प्रवेश जनजागृतीसाठी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.
प्रभात फेरीत गावातील शिक्षणप्रेमी नागरीक,पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. प्रभात फेरीनंतर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित पालकांचा , पदाधिकारी यांचा स्वागतरूपी सन्मान मुख्याध्यापक कुलकर्णी विकास व शाळेतील शिक्षकांनी केला. सोनवणे डी.एन.यांनी जि प शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत दिल्या जाणाऱ्या विविध लाभाच्या योजनांची व शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.मुख्याध्यापक कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने चॉकलेट न वाटप करता एक पुस्तक भेट द्यावे अशी सूचना दिली.यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रवी महाराज राठोड यांनी पहिलीचा वर्ग दत्तक घेऊन मोफत लेखन साहित्य वाटप केले..यावेळी लक्ष्मण चव्हाण, किसन राठोड, रवी राठोड,तेजस राठोड,सौ.सुवर्णा चव्हाण,अनुसया चव्हाण उपस्थित होते.