आलियाबाद येथे कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण संपन्न 

नळदुर्ग ,दि.०३

तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत ग्राम कृषी विकास  समिती सदस्य व स्वयंसेवक  यांना शासनाच्या वतीने युट्यूब चॅनेलवर लाईव्ह प्रशिक्षण देण्यात आले .

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, प्रधान सचिव कृषी विकास चंद्र रस्तोगी , प्रकल्प संचालक परिमल सिंह, पाणी फाऊंडेशनचे‌ डॉ अविनाश पोळ, पोपटराव पवार यांनी मार्गदर्शन केले. नुकतीच आलियाबाद गावची नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २  (पोखरा) मध्ये निवड झाली आहे.

सुक्ष्म नियोजन करून गावाचा आराखडा तयार करणे, बदलत्या हवामानासाठी शेतीसाठी लोकचळवळ, पाऊस पाण्याचा ताळेबंद आणि जलसंधारण, शेतीवर आधारित उद्योग, हवामान अनुकूल शेतीसाठी अर्थसाहाय्य, बदलत्या हवामानात गावाची उभारणी करण्यासाठी ग्रामपंचायतची जबाबदारी या विषयावर वरील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

यावेळी माजी सभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, कृषी साहाय्यक संतोष माने, ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे, डॉ.वाय के.चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, सुभाष नाईक,निजामोद्दीन काझी, सुभाष चव्हाण, संदीप राठोड, किरणं चव्हाण, शिवाजी चव्हाण, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य,ग्राम विकास समितीचे सदस्य, स्वयंसेवक उपस्थित होते.
 
Top