दादासाहेब फाळके जन्मभूमी या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित चित्रपट महामहिम दीदीजी मुर्मू मध्ये मराठवाड्याचे योगदान...

गीतकार  धाराशिवच्या स्नुषा

    धाराशिव,दि.०३

  बी के सुरभी या ब्रह्माकुमारी संस्थेच्या विद्यार्थिनी असून त्या कवयित्री लेखिका आणि गीतकार पण आहेत . आतापर्यंत त्यांनी ओम शांती, शांती प्रोडक्शनच्या अनेक चित्रपटांमध्ये गीत लेखन केलेलं आहे. सृष्टी ,देव पावला, अपनापन हे त्यांचे आधीचे चित्रपट असून महामहिम दीदीजी मुर्मू या चित्रपटामध्ये थेट राष्ट्रपतींच्या जीवनावर आधारित गीत लेखन करून त्यांनी खूप मोठा सन्मान प्राप्त केलेला आहे .संपूर्ण चित्रपटात एकमेव गीत लिहिण्याचे भाग्य त्यांना मिळाले. 

कारण त्या ब्रह्माकुमारी संस्थेशी खूप दिवसांपासून जोडल्या गेलेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हिप्परगा कवळी येथील त्या कन्या असून धाराशिव जिल्ह्यातील वडगाव सिद्धेश्वर येथील स्नुषा आहेत. ग्रामीण भागात राहूनही सिद्ध लेखनीच्या आधारे कवयित्रीने गरुड झेप घेतल्यामुळे सगळीकडे कौतुकाचा वर्षाव होत आहे.


  नुकतेच  दि. 29 मार्च  नाशिक मध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवांमध्ये "महामहिम दीदीजी" या चित्रपटाला दादासाहेब फाळके जन्मभूमी या सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निर्मात्या बी. के. प्रभा मिश्रा ,दिग्दर्शक बी.के. पंपोष मिश्रा, गीतकार बी .के .सुरभी ,संगीतकार नरेंद्र पुरोहित आणि सुनील दधीच, गायीका साधना सरगम ,अभिनेत्री संपा मंडल असा या चित्रपटाचा आकृतीबंध आहे.
 
Top