राज ठाकरेंच्या आदेशानंतर नळदुर्ग येथे ही निवेदन
बँकेत मराठीचा वापर व नदी स्वच्छतेसाठी पालिकेला मनसेचे साकडे 

नळदुर्ग,दि.०३

 गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून मुंबई येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करत महाराष्ट्रातल्या नद्या विषयी चिंता व्यक्त केली,त्याच बरोबर महाराष्ट्रातील सर्व बँकेत मराठीत व्यवहार व्हायला हवेत. जे रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत.  त्याच अनुषंगाने नळदुर्ग येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन मराठीचा वापर होतो का? त्याची पाहणी केली व व्यवस्थापक यांना त्याबाबत निवेदन दिले.

तसेच नळदुर्ग शहराला नैसर्गिक देणगी लाभलेली बोरी नदी असुन या नदीत  शहरातील नालीचे पाणी,टाकाऊ वस्तू,कपडे,वाढलेले बेशरम गवत यामुळे पावित्र्य नष्ट होवुन विद्रुप होत आहे. पालिकेने तात्काळ नदी स्वच्छता मोहीम राबवून नदीला नालीच्या पाण्यापासून व घाणीच्या विळख्यातुन कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात असे निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर संघटक रवि राठोड आदीच्या स्वाक्षरी आहेत,यावेळी गामीण विभाग अध्यक्ष गणेश बिराजदार,संदीप वैद्य उपस्थित होते.
 
Top