नंदगावात खुलेआम चालु असलेले मटका, चक्री ,गावठी दारु या अवैध धंदेवाल्यांचे मुसक्या आवळण्याकरिता ग्रामपंचायतीची जिल्हाधिका-यकडे धाव 

नळदुर्ग, दि.०३

 नंदगाव ता.तुळजापूर या गावात खुलेआम चालु असलेले सर्व अवैध धंदे  तात्काळ बंद करावे अन्यथा धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थासह आमरण उपोषणाचा इशारा नंदगाव ग्रामपंचायतीच्या वतीने  जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे गुरुवार दि. 3 एप्रिल रोजी दिला आहे. 

नंदगाव येथे सध्या बस स्थानक समोर व गावात इतर ठिकाणी बेकायदेशीर रित्या दारू विक्री व गावठी हातभट्टी दारू व जिल्हा परिषद प्रशाला गेटच्या समोर अवैधरित्या मटका व चक्री जुगार हे धंदे खुलेआम जोमात चालू आहेत. याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होत आहे. गावातील अनेक जण दारू व मटका या व्यसनाच्या आहारी जाऊन 30 ते 45 या वयोगटातील तरुण मुले मृत्युमुखी पडल्याचे निवेदनात नमूद करून अनेकांचे कुटूंब उध्वस्त झाल्याचे म्हटले आहे. 

गावातील चालु असलेले सर्व अवैध धंदे लवकरात लवकर बंद करण्यात यावे, अन्यथा याप्रकरणी नंदगाव ग्रामपंचायत कार्यालय व समस्त ग्रामस्थांच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याच इशारा देण्यात आला आहे.

निवेदनाची  प्रत माहितीस्तव पोलीस अधीक्षक धाराशिव, उपविभागीय पोलीस अधिकारी तुळजापूर ,पोलीस निरीक्षक नळदुर्ग आदिना देण्यात आले आहे. या निवेदनावर  सरपंच सौ महादेवी चुनगुंडे, माजी संरपच सौ राधिका घंटे, ग्रामपंचायत सदस्या  सौ रेणुका गुड्डे, कोमलबाई काटे, मीनाक्षी मोरे, राधिका कांबळे, नंदाबाई कामशेट्टी, शशिकांत नागिले, धनराज कलशेट्टी, वीरसंगप्पा जमादार, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सिद्धेश्वर कोरे, प्रतिष्ठित नागरिक विश्वजीत घंटे, सतीश काटे, संतोष कांबळे, जयप्रकाश करंडे, हिरालाल वाले, परमेश्वर चिनगुंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top