सेवानिवृत्तांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा समजुन पेन्शनधारकांची सेवा करेन; आमदार प्रविण स्वामी

मुरुम ,दि.०४

महाराष्ट राज्य सेवानिवृत्त शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना उमरगा शाखेच्या वतीने दि.३एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्रशाला,उमरगा सभागृहात आयोजित सेवानिवृत्त शिक्षक आमदार प्रविण स्वामी,जाने.२५ ते मार्च२५अखेर सेवानिवृत् व पंचायत समिती कार्यालयातील कर्मचारी,अधिकारी सत्कार सोहळा प्रसंगी सत्काराला उत्तर देताना आ.प्रविण स्वामी म्हणाले " पेन्शनरांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा समजुन सेवानिवृत्तांच्या समस्या  सोडवणार आणि वयोवृध्दांना पेन्शन संदर्भात शासकिय कार्यालय, बॅकांना हेलपाटे मारावे लागु नये यासाठी योग्य सुचना संबधिताना दिल्या जातील.आणि जि.प.शाळेत  शक्य तेथे इ.९वी,१०वी चा वर्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.मी स्वत:आज संघटनेचा आजीव सभासद होत असुन सभासदत्व स्विकारत आहे."

    प्रारंभी साविञीबाई फुले प्रतिमा पुजन व दिपप्रज्वलानंतर मान्यवर,सेवानिवृत्तांचा सन्मान करण्यात आला.प्रास्ताविक कमलाकर मोटे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष देविदास बनसोडे, जिल्हाउपाध्यक्ष तर प्रमुख  अतिथी जिल्हाध्यक्ष प्रदिप मोकासे,जि.प.हाय.सोसा.चे चेअरमन पदमाकर मोरे,राज्य संघटक मनोहर वाघमोडे, शिवाजी सुरवसे,जिल्हा सरचिटणीस अशोक साखरे,नुतन गटशिक्षणाधिकारी काकासाहेब साळुंके,तालुकाध्यक्ष शाहुराज चव्हाण हे उपस्थित होते.

   प्रदिप मोकासे,काकासाहेब साळुंके,विनायक माने,शंकर व्हट्टे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र पाटील,दयानंद बेळंबकर, काशिनाथ निर्मळे,विजय पाटील,राजेंद्र पुजारी, श्रीम.प्रेमकला व्हंताळकर,चंद्रकला पाटील व इतरांनी प्रयत्न केले.

 कार्यक्रमास वयोवृध्द पेंन्शनधारकांची उपस्थिती कडक्याच्या उन्हातही लक्षणीय होती.सुञसंचलन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका सरिता उपासे तर पदमाकर मोरे यांनी"सेवानिवृत्तांनी जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी गुढी पाडवा,पट वाडवा.अभियानात सहभागी होऊन सहकार्य करावे."असे आवाहन करुन उपस्थितांचे अभार मानले.
 
Top