भाजपा नळदुर्ग सर्कल ग्रामीण अध्यक्षपदी रंजनाताई राठोड यांची निवड 

तुळजापूर,दि.२२:

 तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथील भाजपा महिला अघाडीच्या सौ. रंजना विलास राठोड यांची भाजपा नळदुर्ग सर्कल ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 आमदार राणाजगजितसिंह पाटील व सुनील  चव्हाण , भाजपाचे  जिल्हा माजी अध्यक्ष नितीन काळे , दत्ता कुलकर्णी , माजी तालुकाध्यक्ष संतोष बोबडे , जिल्हा परिषद माजी  अध्यक्ष नेताजी पाटील, विक्रमसिंह देशमुख, अस्मिताताई कांबळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आशिष सोनटक्के यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी यांच्या  प्रमुख उपस्थितीत तुळजापूर येथे आयोजित भाजपा प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात  रंजनाताई विलास राठोड याना सदर निवडीचे नियुक्ती पत्र दिले .

 निरीक्षकांनी निवडीची घोषणा करताच  माजी सरपंच वसंत पवार , दामाजी राठोड , माजी पं.स सदस्य महादेव सालगे , अनिल पवार , दिनेश राठोड , मनोज चव्हाण , श्रीमंत राठोडसह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी  रंजनाताई  राठोड याचा  सन्मान केला .

 सत्कारास उत्तर देताना भाजपाच्या  रंजनाताई  राठोड बोलताना म्हणाल्या की , भारतीय जनता पार्टी धाराशिव  व आमदार राणाजगदीतसिंह  पाटील यांचे जाहीर आभार व्यक्त करीत पक्षाने माझ्यावर  जबाबदारी सोपवली आहे ती  जबाबदारी मी चोखपणे पार पाडून सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवून भारतीय जनता पार्टीचे हात बळकट करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे सांगितले  .

या निवडीबद्दल गणेश  सोनटक्के, सिध्देश्वर कोरे, अरविंद पाटील, अँड दिपक  आलुरे, साहेबराव घुगे, दत्ता राजमाने, विवेकानंद मेलगिरी, अंगद जाधव, महादेव सालगे ,युवराज पाटील, संजय मोटे, अतुल भोसले, शरद भोसले, संजय माने आदीसह जळकोट ,अणदूर, नंदगाव, शहापूर गटातील गणप्रमुख,शक्ति केंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष यांनी अभिनंदन केले, 
 
Top