नाट्य कलावंत अर्जुन जाधव यांचे निधन
वागदरी,दि.२१ :
शहापूर ता.तुळजापूर येथील भटक्या विमुक्त जाती जमातितील कैकाडी समाजाचे जेष्ठ नाट्य कलावंत अर्जुन भिमराव जाधव यांचे नुकतेच आजाराने निधन झाले.
कै.अर्जुन जाधव हे अखिल भारतिय भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सेंट्रल रेल्वे बोर्डाचे सदस्य बिभिषण जाधव यांचे वडिल होते. कै.अर्जुन जाधव यांची शहापूर व पंचक्रोशीत उत्कृष्ठ नाट्य कलावंत म्हणून ओळख होती. त्यानी आपल्या हायातीमध्ये पारंपारिक व्यवसाय जोपासत अनेक नाटकात नाटय कलावंत म्हणून समाज प्रबोधनाचे कार्य केले.
दि.१७ सप्रिल २०२५ रोजी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्याच दिवशी दुपारी ३ वा. दरम्यान त्यांच्या पार्थीवावर शहापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं, तिन मुली,सुना, जावाई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.